GK : भारताचा सर्वात मोठा बोगदा कोणता ? बहुतेकांना माहिती नसेल ?
Tv9 Marathi February 04, 2026 08:45 AM

आपण सर्वांनी प्रवास करताना अनेकदा बोगदे पाहिले असतील, कधी रेल्वेने प्रवास करताना तर कधी रस्त्याने वाहनातून प्रवास करताना आपले बोगदे पार केले असतील. परंतू जगात सर्वात मोठा बोगदा कोठे आहे याची कल्पना तुम्हाला आहे का ? याचे उत्तर अनेकांना माहिती नसेल कारण अनेकांना कोकण रेल्वेवर बोगदे आहेत, त्यामुळे त्यातील बोगदे मोठे वाटत असतील, परंतू देशातील सर्वात मोठा बोगदा कोणता याचे उत्तर शोधूयात….

भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता ?

आपण ज्या बोगद्याची चर्चा करत आहोत तो सर्वात लांब बोगदा हा जम्मू -कश्मीरात आहे. भारताच्या सर्वात लांब बोगद्याचे नाव पीर पंझाल रेल्वे बोगदा होय..पीर पंझाल बोगदा बनिहाल आणि काझीगुंड रेल्वे बोगदा नावाने देखील ओळखला जातो.

किती लांबी आहे पीर पांझाल रेल्वे बोगद्याची ?

जम्मू-कश्मीर येथील पीर पंझाल रेल्वे बोगद्याची लांबी सुमारे ११.२१ किलोमीटर आहे. हा देशातील सर्वात लांब बोगदा आहे.

भारताच्या टॉप-५ बोगदे कोणते ?
  • भारताच्या पाच सर्वात लांब बोगद्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पीर पंझाल रेल्वे बोगदा येतो. ज्याची लांबी सुमारे ११.२ किलोमीटर आहे.
  • 2.  त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्यामा प्रसाद मुखर्जी बोगद्याचा क्रमांक येतो. ज्याची लांबी ९.०२८ किलोमीटर आहे. हा देखील जम्मू-कश्मीर येथे आहे.

    3. तिसऱ्या क्रमांकावर अटल बोगद्याचा नंबर लागतो. अटल बोगद्याची लांबी सुमारे ९.२ किमी आहे.

    4. चौथ्या क्रमांकावर तिरुवनंतपुरम पोर्ट बोगदा आहे, हा बोगदा सुमारे ९ किमीचा आहे.

    5. पाचव्या क्रमांकावर बनिहाल-काझीगुंड रस्ता बोगद्याचा असून त्याची लांबी सुमारे ८.४५ किमी आहे.

    © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.