Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी, पोलिसांना दिले आहेत.
Top 10 News: कुणाल कामराला एकनाथ शिंदेंवर विडंबन भोवलं ते ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ घरांची विक्री प्रक्रिया स्थगितगॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक २० तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंवर विडंबन भोवलं! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंना नोटीसदरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसी कडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. तसेच वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले.