Cyber Crime Scam : ऑनलाईन फसवणूक (Online Fraud Case) प्रकरणी ग्राहकाने स्वतः ओटीपी दिल्यास बँक निर्दोष असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्राहक न्यायालयाने (Consumer Court) दिला आहे. परिणामी, मुंबईतील एका रहिवाश्याची या संबंधित असलेली तक्रार ग्राहक न्यायालयाने फेटाळून लावत या निर्वाळा दिला आहे. बनावट लिंकवर तक्रारदारने स्वतः क्लिक केल्याने आणि सर्व तपशील (क्रेडेन्शियल) जुळल्याने ओटीपी जनरेट झाला. त्यामुळे बँकेकडे पैसे नाकारण्याचे कोणतेच कारण नसल्याचा बँकेचा युक्तिवाद न्यायालयाकडून मान्य करण्यात आला आहे. सोबतच, जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने ऑनलाईन फसवणुकीला तक्रारदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं स्पष्ट करत हि तक्रार फेटाळली आहे.
गेल्या काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यातून अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तर सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्यावापरून नागरिकांना आर्थिक गंडा घालत असतात. अशातच पोलिसांकडून देखील वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देण्यात येतात. मात्र असा असतानाही फसवणुकीच्या भूलथापांना ग्राहक बळी पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ग्राहकाने स्वतः ओटीपी दिल्यास बँक निर्दोष असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्राहक न्यायालयाने दिला आहे.
Online Fraud Case : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; छत्तीसगड राज्यातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मागील काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यातून अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशातच स्थानिक लोकांची बँक खाती पैशाच्या आमिषाने मिळवून त्यांचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी करणाऱ्या टोळीचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाईत बँक खाते, चेकबुक, सिम कार्ड व 3 अँड्रॉइड मोबाईलसह 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकून दोन इसमांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्यांची नावे शेख आसिफ शेख अहमद (27) व सचिनकुमार संतोष पटेल (22), दोन्ही रा. दंतेवाडा, छत्तीसगड अशी सांगितली.
Bhandara Crime : भंडाऱ्यात सराफा व्यावसायिकाला घातला 42 लाखांचा गंडा
सोनं शुद्ध करून देण्याच्या बहाण्यानं एका सराफा व्यावसायिकाला तब्बल 42 लाख 37 हजारांनी गंडविल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या तुमसरात समोर आलाय. शेख रहमत उर्फ बबलू अली शेख सोरब अली असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नावं आहे. तर, विशाल भारती (35) असं फसवणूक करणाऱ्याचं नावं आहे. फिर्यादी शेख रहमत हे आरोपीकडे मागील 15 वर्षांपासून सोनं शुद्ध करण्याचं काम करीत आहेत. ९ ते १६ जानेवारी या कालावधीत रहमत शेख यांनी विशाल भारती याच्याकडे 488 ग्रॅम सोनं शुद्ध करण्यासाठी दिलं होतं. त्यापैकी 86.400 ग्रॅम सोनं शुद्ध करून उर्वरित 300.500 ग्रॅम सोनं परत केलं नाही. याप्रकरणी फिर्यादीनं तुमसर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेने तुमसरच्या सराफा व्यवसायकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.