Sangli ZP : विसापूरमध्ये 'समझोता एक्स्प्रेस'ला ब्रेक; राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना
esakal February 05, 2026 11:45 AM

विसापूर : विसापूर जिल्हा परिषद मतदार संघात दोघे आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य पुन्हा आमने-सामने ठाकले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी तयार झालेल्या ‘समझोता एक्स्प्रेस’ला आता ‘ब्रेक’ लागला आहे.

ही लढत आमदार रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच असणार आहे. भाजपकडून येथील युवा नेत्याला उमेदवारी दिल्याने हा सामना तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाई:-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक हालचाली.

जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले प्रा. डी. ए. माने यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार पक्ष) विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) माजी जिल्हा परिषद सुनील पाटील, तर भाजपकडून अमित माने हे निवडणूक रिंगणात आहेत.

गेल्या निवडणुकीत दोघा आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली. मात्र ही ‘समझोता एक्स्प्रेस’ जिल्हा परिषदेसाठी तुटली. दोघांनीही जिल्हा परिषदेसाठी आता दंड थोपटले आहेत.

Sangli ZP : भाजपला रोखण्यासाठी पुन्हा चक्रव्यूह; जिल्हा परिषद रणधुमाळीला सुरुवात

आमदार रोहित पाटील यांचे समर्थक अर्जुन पाटील, तर खासदार संजय पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते सुनील पाटील अशी लढत होणार आहे. येथील तरुण कार्यकर्ते अमित माने यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.

गेल्या वर्षभरात त्यांनीही सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण केली आहे. या मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. विसापूर पंचायत समिती गणातून आमदार रोहित पाटील गटाकडून रवींद्र पाटील व बोरगाव मधून माजी जिल्हा परिषद सदस्य निवास पाटील यांच्या पत्नी कल्पना निवास पाटील यांच्यासमोर खासदार संजय पाटील गटाच्या बोरगावचे माजी सरपंच नवनाथ पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील व पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांचे आव्हान असणार आहे. विसापूर गणात भाजपकडून अक्षय जाधव व बोरगाव गणातून सीमा सरदार सावंत निवडणूक लढवत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.