Imran Khan on divorce: आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान (Imran Khan) सध्या चर्चेत आहे त्याच्या चित्रपटसृष्टीतील कमबॅकमुळे. जाने तू या जाने ना, आय हेट लव स्टोरी, गोरी तेरे प्यार में, असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता इम्रान खान गेल्या 11 वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब होता. तू आता हॅपी पटेल या चित्रपटातून पुन्हा पदार्पण करणार आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे तो अजूनही चर्चेत असतो. त्याचं वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. मानसिक तणाव, बायको अवंतिका मलिकसोबतचा घटस्फोट, सिंगल पेरेंट म्हणून असणारी जबाबदारी या सगळ्या गोष्टींशी तो डील करत आहे. दरम्यान ई टाइम्सशी बोलताना त्याने पत्नी अवंतिका सोबतच्या घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे.
घटस्फोटा विषयी इम्रान म्हणाला,' 2016 मध्ये काहीतरी गडबड असल्याची पहिल्यांदा जाणीव झाली. तेव्हा मी अजून अवंतिकासोबत राहत होतो. मी एका भीतीने आणि चिंतामणात धरून जगाशी संवाद साधत होतो. तेव्हा मला वाटायचं मी शांत आहे. पण आतून मी पूर्णतः तुटलो होतो. जेव्हा मी विचार केला तेव्हा जाणवलं की मी माझी जी इमेज घेऊन जगतोय ती खरी नाही. मला ती बदलायची होती. 2016 मध्ये मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करण्यास सुरुवात केली. याच काळात मला जाणवलं की पत्नीसोबत असणार माझं नातं अस्वस्थ आहे.
इम्रान पुढे म्हणाला," आम्ही खूप लहान वयात नात्यात आलो. नात्यातील चांगले वाईट समजून घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा अनुभव नव्हता. जसे जसे पुढे जात राहिलो तस जाणवू लागलं की आम्ही अशा चक्रात अडकलो आहोत जे आपण तोडू शकत नाही. कोणताही बदल करण्यासाठी दोघांकडून प्रयत्न करावे लागतात. आणि ते घडत नव्हतं. मला जाणवलं की स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी मला ह्या नात्यातून बाहेर पडावे लागेल. स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी, उपचारांसाठी मी पत्नीकडून घटस्फोट घेतला. तो म्हणाला,' घटस्फोटाचा दोष मी कोणालाही देत नाही. मी लोकांच्या नजरेतून दूर राहिलेलो आहे. माझ्या अनुपस्थितीत अनेक अफवा, नको त्या चर्चा पसरल्या. त्यामुळे गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या. घटस्फोटामुळे माझी प्रकृती बिकट झाल्याचं अनेकांना वाटत होतं. माझ्या वैवाहिक आयुष्यातील शेवटचे काही वर्षे सर्वात वाईट गेली. त्यामुळे ते नातं संपवण्याचा निर्णय माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. त्यामुळे मला बरे होण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळाली. आमच्यात कोणतीही सुसंगतता नव्हती. एकमेकांना सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही आधार देऊ शकलो नाही. असं इम्रान म्हणाला.