स्मृती मानधना, पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? सांगलीतल्या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या अभिनेत्यानं सांगितली 'त्या' रात्रीची कहाणी
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क February 05, 2026 03:43 PM

Nandish Sandhu Reaction On Smirti Mandhana Palash Muchhal Wedding: गायक (Singer), संगीतकार (Musician) पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि स्मृती मानधना (Smirti Mandhana) 23 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील (Maharashtra News) सांगलीत लग्नगाठ बांधणार होते. पण, अचानक लग्नापूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या आणि लग्न मोडलं. लग्नाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? याबाबत अनेक चर्चा रंगल्या. त्यात लग्नाच्या आदल्या रात्री संगीत समारंभानंतर स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मग, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे वऱ्हाड परतल्याचंही सांगितलं गेलं. तर, कुणी पलाशनं स्मृतीची फसवणूक केल्यामुळे दोघांचं लग्न मोडल्याचंही सांगितलं गेलं. अशातच, आता स्मृती, पलाशच्या लग्नाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलेलं? याबाबत त्या रात्री लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या एका अभिनेत्यानं सांगितलं आहे. 

"पलाशला त्याचीही बाजू मांडू द्या..."  

पलाश, स्मृतीच्या लग्नसोहळ्याला सांगलीत टेलिव्हिजन अभिनेता नंदीश संधूही उपस्थित होता. त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या लग्नसोहळ्याबाबत सांगितलं आहे. मिस मालिनी यांच्या मुलाखतीत, नंदीशनं पलाशवरील फसवणुकीच्या आरोपांबद्दल बोलण्यास नकार दिला आणि म्हणाला की, "याबद्दल आत्ता काहीही न बोलणंच चांगलं आहे. पलाशला त्याची बाजू मांडू द्या..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NANDISH SINGH SANDHU (@nandishsandhu)

"स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडलेली..."

अभिनेता नंदीश संधू म्हणाला की, "पलाशची बाजू ऐकण्यासाठी कोणीही त्याच्याशी संपर्क साधला नाही... मी लग्नाला गेलो होतो, पण लग्नच झालं नाही... नंतर मला कळलं की, ते लग्न मोडलंय..."  पुढे बोलताना नंदीश संधूनं सांगितलेलं की, स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळेच लग्न पुढे ढकललेलं. 

अभिनेता म्हणाला की, "लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं, कारण तेच सांगण्यात आलं होतं. तुम्हाला सर्वांना सांगण्यात आलं होतं की, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडलीय. ते रुग्णालयात होते आणि म्हणूनच सर्व काही पुढे ढकलण्यात आलंय..."

नंदीशने पुढे स्पष्ट केलं की, "नंतर, मला बातम्या आणि माध्यमांमधून भलतंच कळलं, मला वाईट वाटलं..." स्मृती आणि पलाशच्या नात्याबद्दल बोलताना नंदीश म्हणाला की, "कारण काहीही असो, लग्न झालेलं नाही... तुम्हाला माहीत आहे, मी त्यांचं प्रेम पाहिलंय... मी गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांचं प्रेम फुलताना पाहिलंय... ते खूप क्युट कपल होतं..."

 

Imran Khan on Divorce: '..त्यामुळे नातं संपवण्याचा निर्णय घेतला ', अभिनेता इम्रान खानने पहिल्यांदाच सांगितलं घटस्फोटाचं कारण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.