ज्याची भीती तेच घडलं भारत सोडणार रशियाची साथ, रशियाचा मोठा दावा, थेट…
Tv9 Marathi February 05, 2026 02:45 PM

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ भारतावर लावण्यात आला. अतिरिक्त 25 टक्के आणि मुळ टॅरिफ 25 टक्के असा एकून 50 टक्के अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला होता. पाकिस्तानवर फक्त 19 टक्के टॅरिफ आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करत असल्याने आणि व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेने अचानक मोठा निर्णय घेत भारतावरील मुळ 25 टक्के टॅरिफमध्ये 7 टक्के टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. मुळ टॅरिफ 18 टक्के केला. मात्र, अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कायम आहे. भारतावर आता 43 टक्के टॅरिफ आहे. मात्र, यादरम्यानच अमेरिकेने मोठा दावा केला. भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचे सांगताना अमेरिका दिसली. अमेरिकेच्या दाव्यावर आता थेट रशियाने प्रतिक्रिया दिली आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारताने रशियन कच्च्या तेलाबद्दलची भूमिका बदलली आहे असे मानण्याचे कोणतेही कारण नाही. रशियाने पुन्हा म्हटले की, भारत आणि रशिया या दोन्ही देशांसाठी ऊर्जेची निर्यात आणि आयात फायदेशीर आहे. यासोबतच यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठ स्थिर राहण्यास मदत होते. यासोबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या तेल खरेदीवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारत कोणत्याही देशाकडून कच्चे तेल खरेदी करू शकतो. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दावा केला होता की, अमेरिका आणि भारत यांच्यातील चर्चेनंतर नवी दिल्लीने रशियन तेल खरेदी थांबवली आहे. अमेरिकेच्या या दाव्यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका जाहीर केली.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही सांगितले की, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याबाबत भारताकडून कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नाही. अमेरिका सतत दावा करत असली तरीही भारताने यावर आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. भारत नक्की काय भूमिका घेतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. अमेरिकेच्या दबावमुळे भारताने रशियाची साथ सोडल्याचे सांगितले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.