अजित पवार यांच्या निधनानंतर मुलगा जय पवार याची थेट सोशल मीडियावर पोस्ट, म्हटले, डॅड माझा प्रत्येक..
Tv9 Marathi February 05, 2026 07:46 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अजित पवार आज आपल्यात नाही हे कोणालाही मान्य होत नाही. अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार कुटुंबियांना कोणतीही कल्पना न देता सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. शरद पवार यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. त्यावेळी पवार कुटुंबातील वाद पुढे आला. अजित पवार यांचे स्मारक बारामतीच्या विद्या प्रांगणात होणार आहे, तशी पाहणीही पवार कुटुंबियांकडून करण्यात आली.

काल शरद पवार अजित पवार यांच्या घरी गेले होते. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात भेट झाली. काही तास ही बैठक सुरू होती. अजित पवार यांच्या आठवणीत युगेंद्र पवार, रोहित पवार आणि मुलगा जय पवार सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत.

त्यामध्येच आता जय पवार याने सोशल मीडियावर वडील अजित पवार यांच्या आठवणीत पोस्ट शेअर केली. जय पवार याने म्हटले की, Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील….

जय पवार अजित पवार यांच्या निधनानंतर सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. जय पवार अजित पवार यांच्या अत्यंत जवळ होता. हेच नाही तर अजित पवार यांच्या निधनानंतर जय पवार रडताना दिसला. यावेळी मोठा भाऊ पार्थ पवार हा जय पवार याला सांभाळताना देखील दिसला. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.