Solapur News: प्रशासकांनी करून दाखवले; आता जबाबदारी नगरसेवकांची प्रभावी कामे, सोलापूर शहराच्या समतोल विकासाला गती!
esakal February 06, 2026 06:45 AM

-प्रमिला चोरगी

सोलापूर : महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजापासून नागरिकांच्या तक्रारींच्या निपटाऱ्यापर्यंत प्रभावी ऑनलाइन प्रणाली उभारणे, समांतर जलवाहिनी, पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत वितरण व्यवस्थेत सुधारणा, रस्ते विकास व ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध कामांमुळे गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत सोलापूर शहराच्या समतोल विकासाला गती मिळाली आहे. पाण्यापासून ते प्राण्यांपर्यंतच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक परिणाम दिसून येत असून, हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याची जबाबदारी आता नूतन महापौर व नगरसेवकांवर येऊन ठेपली आहे.

Pune News: कर्तव्याचा 'राजेशाही' सन्मान! ३६ वर्षे साहेबांची गाडी चालवणाऱ्या चालकाला प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वतः गाडी चालवत घरी सोडलं

६ फेब्रुवारी २०२२ पासून महापालिकेवर प्रशासक राजवट लागू झाली. सुरुवातीला तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कारभार पाहिला. सध्या गेल्या सुमारे ११ महिन्यांपासून आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. या तिन्ही प्रशासकांच्या काळात गेल्या १० वर्षांपासून केवळ कागदावर असलेली, तसेच २०-२५ वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महापालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यावर विशेष भर देत समतोल विकास साधला. विशेषतः पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था तसेच डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी झाल्याने प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.

प्रशासक काळातील प्रभावी कामे

ई-ऑफिस प्रणाली

महापालिकेतील फाइल पेंडन्सी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी ऑफलाईन कामकाज बंद करून प्रथमच ई-ऑफिस प्रणाली सुरू केली. त्यानंतरच्या आयुक्त शीतल तेली-उगले आणि डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही प्रणाली अधिक सक्षम केली, त्यामुळे पारदर्शकता वाढून भ्रष्टाचाराला आळा बसला.

कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी

३१० कर्मचाऱ्यांची सरळ भरती, आरोग्य विभागातील भरती, परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा, निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन, अर्जित रजा तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न अशी तब्बल १,२६७ कर्मचाऱ्यांची गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे प्रशासक काळात निकाली काढण्यात आली.

अत्याधुनिक आरोग्य सुविधा

गेल्या ३० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या महापालिकेच्या डफरीन व दाराशा प्रसूतिगृहांचा प्रशासक काळात कायापालट झाला. सीएसआर निधीच्या माध्यमातून ही प्रसूतिगृहे खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर अत्याधुनिक बनविण्यात आली, ज्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.

शहर पाणीपुरवठ्यात सुधारणा

गेल्या १० वर्षांपासून कागदावर असलेला ८९२ कोटी रुपयांचा समांतर जलवाहिनी प्रकल्प आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अवघ्या दीड वर्षात मार्गी लावला. पुढे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी १,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ताकदीने पाठपुरावा केला. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा शक्य झाली.

ई-बस सेवा

चेसीक्रॅक प्रकरणामुळे अनेक वर्षे रखडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करून १०० ई-बस मंजूर करून घेतल्या. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ई-बससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम वेगाने सुरू ठेवले आहे.

सोलापूरला बुलेट ट्रेनचे ऐतिहासिक गिफ्ट! पुणे एक तासात, हैदराबाद सव्वा, तर मुंबई अडीच तासांत गाठणे होणार शक्य.. नाल्यांचे डीपीमध्ये रेखांकन

भांडवली निधी व स्वच्छ वायू उपक्रमांतील निधीचा उपयोग रस्ते विकासासाठी करण्यात आला. नगरोत्थान योजनेतून ४२८ कोटी रुपयांची ड्रेनेज कामे प्रगतिपथावर असून, शहराच्या विकास आराखड्यात प्रथमच १०० वर्षांपूर्वीच्या ७४ नाल्यांचे रेखांकन करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.