Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ऐन निवडणूक काळात गाडीत काठ्या आणि कुराडी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. चार जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी निवृत्ती अंचेवाढ असं गंभीर जखमी असलेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मारहाणीत भाजप कार्यकर्त्याचा हात आणि पाय फॅक्चर झाला आहे. जखमीवर बार्शी येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.