MGV26B15264
मंगळवेढा : नगरपालिका शाळा क्रमांक एकची पाहणी करताना नगराध्यक्षा सुनंदा अवताडे.
.........
मंगळवेढा शहरातील शैक्षणिक व्यवस्था विस्कळित
.........
नगराध्यक्षा आवताडेंकडून शाळांना भेटी; त्रुटींवर तीव्र नाराजी
सकाळ : वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ६ : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्याने शहरातील शैक्षणिक व्यवस्था विस्कळित झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी थेट शिक्षण मंडळाच्या कार्यालयासह शाळांना भेट देत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरात नगरपालिकेच्या आठ शाळा असून त्यामध्ये दोन मुलींच्या आणि एक उर्दू शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अन्य शाळांच्या तुलनेत मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांच्या दर्जा चांगला असल्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती मात्र अलीकडच्या काळात शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्याच्या दृष्टीने लक्ष न दिल्यामुळे सध्या शिक्षण व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. खासगी शाळात प्रवेश वाढला. पटसंख्या कमी झाल्यामुळे नुकत्याच झालेल्या संचमान्यतेत शाळा क्रमांक २ व ५ व कन्या शाळा क्रमांक २ मधील ३ शिक्षक अतिरिक्त ठरले. सध्या शाळा क्रमांक तीनला अध्यायवत इमारत नसल्यामुळे त्यास ती शाळा नगरपालिकेच्या बचत गट इमारतीत भरवली जाते आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून शाळा क्रमांक १ व ५ साठी निधी उपलब्ध झाल्याने या ठिकाणी शाळेचे बांधकाम सुरू आहे. मात्र नगराध्यक्ष सुनंदा अवताडे यांनी शाळेच्या पाहणीसाठी शिक्षण मंडळ कार्यालयास भेट दिली असता या ठिकाणी असलेले पूर्णवेळ प्रशासनाधिकारी नसल्यामुळे प्रभारी म्हणून मरवडे केंद्राच्या विस्तार अधिकाऱ्यांकडून पालिकेच्या शिक्षणाचा गाडा हाकला जात आहे. शाळा क्रमांक एकच्या प्रवेशद्वारासमोर मोठा खड्डा असल्यामुळे विद्यार्थी वारंवार खड्ड्यात पडल्याने जखमी व्हावे लागल्याची माहिती यावेळी शिक्षकांनी दिली. या शिवाय स्लॅब खराब झाल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे त्यासाठी स्वतंत्र अध्यायावत इमारतीची गरज असल्याचे पाहणीत सांगण्यात आले.
------
पालकांच्या सूचनेनुसार मी नगरपालिका शाळांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. शिक्षण व्यवस्थेला गतवैभव मिळवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन, माझी पहिली मागणी नगरपालिका शिक्षण मंडळाला पूर्णवेळ अधिकारी मिळवणे ही आहे. त्यासाठी पाठपुरावा करेन. नंतर इतर सुधारणेकडे लक्ष देईन.
्- सुनंदा अवताडे, नगराध्यक्षा, मंगळवेढा