BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप शनिवारी अर्ज दाखल करणार आहे. महापौरपदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी भाजपचे नवे पक्ष कार्यालय तयार करण्यात आले आहे.
या नव्या कार्यालयात शुक्रवारी पूजा आयोजित केली आहे. त्यानंतर शनिवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक महापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी एकत्रित जाणार आहेत; मात्र महापौरपदाचा उमेदवार कोण, हे मात्र भाजपने गुलदस्त्यात ठेवले आहे.
Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील सेवा तब्बल तीन महिने विस्कळीत राहणार; का आणि कोणत्या?दरम्यान, महापौरपदासाठी राजश्री शिरवडकर, आशा मराठे, तेजस्वी घोसाळकर, अलका केरकर, रितू तावडे या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षातर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षही महापौरपदासाठी आपला उमेदवार देणार आहे. त्यांचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप जाहीर केलेले नाही.
पूजा करणाऱ्यास महापौरपद?मुंबई महापालिका मुख्यालयात भाजपचे कार्यालय सज्ज झाले असून शुक्रवारी भाजपकडे कार्यालयाची चावी मिळणार आहे. पक्ष कार्यालयातील पूजेला बसणारा व्यक्ती मुंबईची महापौर असेल, असे सूचक विधान भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी केले आहे.
Ola-Uber Strike: ओला-उबर चालकांनी संप पुकारला! मनमानी भाडेवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार; पण कधी? जाणून घ्या... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नावे ठरविणारमहापौरपद भाजपला आणि उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाला जाणार, हे निश्चित झाले आहे; मात्र महापौर आणि उपमहापौर कोण असावा, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. ही नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरविणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे सचिव राहुल शेवाळे यांनी सांगितले.