त्या प्रकरणात अडचणी वाढल्या, एकनाथ खडसे यांना दणका, थेट अजामीनपात्र वॉरंट
Tv9 Marathi February 07, 2026 06:45 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या दाम्पत्याच्या विरोधात भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आज या प्रकरणात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

पुणे येथील भोसरी जमिन खरेदी घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले होते.शुक्रवारी या प्रकरणात सुनावणीला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे. या प्रकरणात शुक्रवारी आरोपनिश्चिती होणार होती. मात्र, एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता

विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज डिसेंबर महिन्यात फेटाळला होता. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल झाले आहे. या सुमारे एक हजार पानांच्या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे.याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.