आळेफाटा येथे कांद्याची २२ हजार पिशवी आवक
esakal February 07, 2026 06:45 AM

आळेफाटा, ता. ६ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात शुक्रवारी (ता. ६) २२ हजार ३१२ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारीनुसार एक नंबर कांद्यास दहा किलोस १९१ रूपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे व माजी उपसभापती प्रितम काळे, कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.
आळेफाटा येथे शुक्रवारी झालेल्या मोढ्यांत २२ हजार ३१२ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रति दहा किलो एक नंबर नवीन कांद्यास १७० ते १९१ रूपये, एक नंबर सुपर कांद्यास १५० ते १७० रुपये, दोन नंबर कांद्यास १३० ते १५० रूपये, तीन नंबर गोल्टी कांद्यास ११० ते १३० रूपये व बदला कांद्यास ३० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.