माड्याचीवाडी विद्यालयातील
चार विद्यार्थांना शिष्यवृत्ती
कुडाळ, ता. ६ : ग्लोबल फौंडेशनची ज्ञानज्योती शिष्यवृत्ती माड्याचीवाडी विद्यालयातील चार विद्यार्थांना देण्यात आली. ग्लोबल फौंडेशन पिंगुळीमार्फत दरवर्षी गरीब व हुशार विद्यार्थांना शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षी माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयातील साहिल राऊळ , मंदिरा परब, गौरेश बाईत व बुधाजी गावडे या चार विद्यार्थांना प्रत्येकी ३६०० प्रमाणे ज्ञानज्योती शिष्यवृत्ती मिळाली.
हे फौंडेशन जिल्ह्या मधील वेगवेगळ्या शाळामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच संगणक मार्गदर्शन शिबीर व वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम आयोजित करते. याशिवाय गरीब व होतकरू मुलांना थोडाफार आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने दरवर्षी दरवर्षी ज्ञानज्योती शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षी सिंधुदुर्गातील जवळजवळ १५० गरीब व होतकरू विद्यार्थांना हि शिष्यवृत्ती दिली गेली. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ग्लोबल फौंडेशनचे व्यवस्थापक प्रसाद परब, गुरु देसाई, समीर जोशी, श्री. गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्लोबल फौन्डेशनचे एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक अनंत सामंत यांनी आभार मानले.