मुंबई : वन विभाग, मुंबई गुन्हे शाखा युनिट ९ आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त पथकाने जुहू परिसरातील एका निवासी घरातून बेकायदेशीररित्या ठेवलेल्या एका जिवंत मगरीची आणि एका भारतीय ठिपकेदार कासवाची सुटका (Mumbai Wildlife Crime) केली आहे. या प्रकरणी २९ वर्षीय इम्रान शेख याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Forest Department and Police Joint Action)
जुहू परिसरातील एका घरात मगर बेकायदेशीररित्या ठेवण्यात आल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. ठाणे येथील अंधेरी रेंज कार्यालयात कार्यरत वनरक्षक रोशन सुधाकर भिंडे (वय ४९) यांनी वरिष्ठ वन अधिकारी संतोष डगळे (रेंज फॉरेस्ट ऑफिसर, मुंबई) यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाईचे आदेश देण्यात आले.
३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता वन विभाग, गुन्हे शाखा युनिट ९ (वांद्रे) आणि वन्यजीव बचाव स्वयंसेवी संस्था ‘सर्प इंडिया’च्या सदस्यांचे संयुक्त पथक जे.आर. म्हात्रे मार्ग, जुहू येथील रुईया पार्क, मोरागाव शंकर चाळ, घर क्रमांक ११८ येथे पोहोचले. उपनिरीक्षक उत्कर्ष वाझे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी पथकाला आवश्यक माहिती दिली.
Pune : लग्नाची बोलणी सुरू असतानाच काळाची झडप! बँकेतील लेखापाल युवकाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने 'रेबीज'ने मृत्यू, खामगाववर शोककळाकारवाईदरम्यान दोन स्वतंत्र पंच साक्षीदार उपस्थित होते. बचाव पथकामध्ये सर्प इंडिया संस्थेचे अध्यक्ष संतोष कृष्णा भिंडे, आसिफ अय्यूब पत्रावाला आणि संदीप तानाजी देसाई यांचा समावेश होता. हे सर्वजण आवश्यक वन्यजीव बचाव साधनांनी सुसज्ज होते.
पथकाने घरात प्रवेश केल्यानंतर तेथे शाहिदा इस्माईल शेख (गृहिणी) आणि इम्रान इस्माईल शेख (वय २९, व्यवसाय – चायनीज फूड स्टॉल चालक) हे रहिवासी असल्याची माहिती समोर आली. घरातील १३ बाय ७ फूट आकाराच्या खोलीत अंदाजे ५ बाय २ फूट आकाराच्या काचेच्या टाकीत एक जिवंत भारतीय मगर आणि एक भारतीय ठिपकेदार कासव आढळून आले.
संतापजनक! अकॅडमी चालक जावेदचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; इच्छेविरुद्ध ठेवला शारीरिक संबंध, गोळ्या खाल्ल्याने झाला गर्भपात!अधिकाऱ्यांनी तपासणीअंती स्पष्ट केले की, मगर आणि भारतीय ठिपकेदार कासव या दोन्ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची I अंतर्गत संरक्षित आहेत. या कायद्यानुसार अशा वन्यजीवांना खाजगी ताब्यात ठेवणे, बंदिवासात ठेवणे किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून काढून आणणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी आरोपी इम्रान शेख याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वन विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे.