Pune News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; बोरघाट परिसरात वाहनांच्या रांगा, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात!
esakal February 07, 2026 01:45 PM

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (ता.६) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. विशेषतः बोरघाट परिसरात काही काळ वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे ‘ब्लॉक’ घेत पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गिकांवरून सोडण्यात आली.

Mangalwedha News: सायकलवर जाऊन अजितदादांना श्रद्धांजली; मंगळवेढ्यातील दोन तरुणांचा मंगळवेढा-बारामती प्रवास!

गेले तीन दिवस द्रुतगती मार्गावर गॅस टँकर अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे काही नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले होते. गुरुवारी दुपारनंतर द्रुतगतीवरील वाहतूक पूर्वपदावर आली. त्यानंतर वीकेंड सलग सुट्ट्या आणि पर्यटकांची वाढलेली गर्दी यामुळे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

त्यामुळे सकाळपासून पुण्याकडे येणारी वाहतूक घाट परिसरात मंदावली. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मुंबई मार्गिकेवर काही काळासाठी वाहतूक नियंत्रित करत ‘ब्लॉक’ घेतला.

Pune News: कर्तव्याचा 'राजेशाही' सन्मान! ३६ वर्षे साहेबांची गाडी चालवणाऱ्या चालकाला प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वतः गाडी चालवत घरी सोडलं

या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक खंडाळा बोगद्याजवळ थांबविण्यात आली. तर, पुण्याकडे जाणारी वाहतूक ही बोरघाट पोलिस मदत केंद्राजवळून मुंबई मार्गिकेवरून वरून वळवत पुण्याकडे सोडण्यात येत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.