फिल्म इंडस्ट्रीत उड़ता पंजाब! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीसह दिग्दर्शक ताब्यात, 8 जण अटकेत
भाग्यश्री कांबळे February 07, 2026 02:43 PM

Drug Racket Exposed in Chennai: सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. चेन्नईमधून समोर आलेल्या एका नवीन ड्रग्ज प्रकरणाने  दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात खळबळ उडाली. या प्रकरणातून काही प्रसिद्ध नावेही समोर आली आहेत. यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलं.  गुरूवारी एका गुप्त कारवाईत अँटी नार्कोटिक्स इंटेलिजेंस युनिटने आठ जणांना ताब्यात घेतलं.  या प्रकरणात अभिनेत्री अंजू कृष्णा (वय वर्ष 30) आणि तामिळ इंडस्ट्रीतील असिस्टेंट डायरेक्टर विंसी निवेथा या दोघींचे नाव समोर आले आहे. हे प्रकरण समोर येताच साऊथ सिनेसृष्टीत खळबळ उडाली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  नेसापक्कम परिसरातून अटक करण्यात आलेल्या विघ्नेश्वरने (वय वर्ष 30) या संपूर्ण प्रकाराचे धागेदोरे उघड केले.  त्याने संपूर्ण नेटवर्क उघड केले. चौकशीदरम्यान, त्याने  पोरूरजवळील कोवर परिसरातील रहिवासी व्यंकटेश कुमारकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे उघड केले. याच माहितीच्या आधारे,  एएनआययू साऊथ टिमने पुढील योजना आखली. तसेच हे प्रकरण उलगडण्यासाठी विशिष्ट रणनीती आखण्यास सुरूवात केली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anju Krishna (@anjukrishna_official)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून वेंकटेश कुमारशी संपर्क साधला होता. प्लॅननुसार,  पोलिसांचे वाहन वलसरवक्कमच्या एका प्रमुख भागात पोहोचताच पथकाने ताबडतोब परिसराला घेराव घातला.  वेंकटेश कुमार आणि त्यांच्या  साथीदारांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.  या कारवाईत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली.  अटक केलेल्या आरोपींमध्ये कार्तिक राजा, यशवंत, श्रीराम, विंसी निवेथा, अल्विबिंशा आणि अंजू कृष्णा या प्रसिद्ध नावांचा समावेश आहे.  झडती घेतली असता, पोलिसांना ड्रग्ज सापडले. पोलिसांनी त्यांचे फोन देखील  जप्त केले आहे.

पोलिसांनी  सर्व आरोपींना न्यायलयात हजर केले.  न्यायलयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नेटवर्कशी संबंधित  आणखी व्यक्ती उघड होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.  संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचे मूळ उलगडण्यासाठी जप्त केलेले मोबाईल फोन आणि डिजिटल डेटा देखील तपासला जात आहे.  या प्रकरणानंतर साऊथ सिनेसृष्टीत खळबळ उडाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसच्या घरात जीवे मारण्याची धमकी; 'तलवार चालवणार' विधानामुळे वाद, दिव्या शिंदेची थेट हकालपट्टी, नेमकं घडलं काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.