Satara Elections: गावागावांत मतदानाचा उत्सव! सातारा जिल्ह्यात २८७७ मतदान केंद्रांवर सोय; १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ड्रोनद्वारे वॉच
esakal February 07, 2026 01:45 PM

सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील २८७७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १३ हजार ०९७ शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला गटासाठी एक व गणासाठी एक अशी दोन मते देता येणार आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, आज नेमून दिलेल्या ठिकाणी शासकीय कर्मचारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी रवाना झाले आहेत.

Mangalwedha News: सायकलवर जाऊन अजितदादांना श्रद्धांजली; मंगळवेढ्यातील दोन तरुणांचा मंगळवेढा-बारामती प्रवास!

जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी उद्या (शनिवार) जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील २८७७ केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य घेऊन शासकीय यंत्रणा आज रवाना झाली आहे. यावेळेस तब्बल २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १३ हजार ०९७ शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच सात हजारांवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

मतदानाला जाताना हे लक्षात ठेवा...

मतदान केंद्रावर जाताना मतदान कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊनच जावे. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आपल्या सहकाऱ्याकडे किंवा मोबाईल कक्षात ठेवावा. त्यासोबतच पाणी बाटली सोबत घेऊन जावे. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राज्य किंवा केंद्र शासन कर्मचाऱ्यांचे फोटो ओळखपत्र, बॅंक, टपाल कार्यालयाचे फोटो ओळखपत्र, मनरेगाचे जॉब कार्ड, पेन्शन पुस्तक, पेन्शन ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र, अपंगत्व ओळखपत्र यापैकी कोणतेही एक आणि त्यासोबत मतदान स्लीप अपेक्षित आहे.

प्रत्येक तालुक्यामध्ये विशेष निगराणी पथक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक, दहा पोलिस उपअधीक्षक, २५ पोलिस निरीक्षक, १६० सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, दोन हजार ९०० पोलिस कर्मचारी, चार हजार ५०० गृहरक्षक दलाचे जवान व राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रत्येक तालुक्यामध्ये विशेष निगराणी पथके तयार करण्यात आली आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी शांततेत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन अधीक्षक दोशी यांनी केले आहे.

गट, गणासाठी बॅलेटचा रंग वेगळा

यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक गट, त्या खालील दोन गण आहेत. त्यापैकी एका मतदाराला गटातील उमेदवारासाठी एक व त्याखालील गणातील उमेदवारासाठी एक असे दोन मते देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एक मतदार दोन मते देणार आहे. गटासाठी व गणासाठी असलेल्या बॅलेटचा रंगही वेगळा ठेवण्यात आलेला आहे.

Pune News: कर्तव्याचा 'राजेशाही' सन्मान! ३६ वर्षे साहेबांची गाडी चालवणाऱ्या चालकाला प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वतः गाडी चालवत घरी सोडलं जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान प्रक्रियेसाठी २८७७ मतदान केंद्रांवर १२ हजार ६६८ कर्मचारी आवश्यक होते. त्याबदल्यात जिल्हा प्रशासनाने १३ हजार ०९७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सीटीईटी परीक्षेमुळे २००९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करून नव्याने २२५४ शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.