तेच सभागृह, तेवढीच गर्दी पण अजितदादा नाहीत, रुपाली चाकणकर भर मंचावर रडल्या, पाहा VIDEO
अंकिता खाणे February 07, 2026 04:43 PM

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली, या घटनेने पक्षाचे नेते, कार्यकर्ते अद्यापही धक्क्यात आहेत. अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात काल अजित पवारांना (Ajit Pawar) श्रद्धांजली वाहत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी अजितदादांबाबतच्या आठवणी व्यक्त केल्या, यावेळी त्या काहीशा भावून झाल्यास त्या बोलताना म्हणाल्या, ज्या बालगंधर्व सभागृहामध्ये आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहतोय, त्या सभागृहामध्ये आदरणीय दादांचे अनेक कार्यक्रम झाले, अनेक योजनांचे उद्घाटन झाले, अनेक मेळावे झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन याच सहभागृहामध्ये साजरा केला गेला होता, इतकंच काय जर बालगंधर्व सभागृहाचा पुनर्विकास करायचा तर जो काही निधी लागेल तो मी देण्यासाठी पुढे येईल असं दादा स्वतः बोलले होते, आज सभागृह तेच आहे, गर्दीत तीच आहे, माणसं तीच आहे, पण माणूस तो नाहीये, त्या माणसासाठी आपण जमलो आहोत, असं म्हणत त्या भावूक झाल्या.(Rupali Chakankar)

अगदीच माझ्याबद्दल कोणी तक्रार केली तर माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल

दादांबद्दल खूप आठवणी आहेत, विचारांचा गाव खूप आहे, खरं तर 2002 मध्ये गाव समाविष्ट झाली, आणि प्रभाग पद्धतीमध्ये पहिल्या निवडणूक झाल्या आणि माझ्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर यांना दादांनी उमेदवारी दिली, खूप मताने त्या निवडून आल्या आणि नऊवारी साडीतल्या महानगरपालिकेतल्या सर्वात ज्येष्ठ नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या, दादा कायम त्यांच्या कामासाठी तत्पर होते, आमच्या नानींचा कामाला तेव्हा सुरूवात झाली, तेव्हापासून आदरणीय दादांसोबत सुरू झालेला आमच्या सगळ्यांचा हा प्रवास 2009 ला सुप्रिया ताईंचे लोकसभेचे निवडणूक लागली, दादांनी सकाळी लवकर नानींना फोन करून सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी सुप्रियाचं काम करा आणि रूपाली तिचे बचत गट खूप आहेत, तिला बचत गटातल्या महिलांना काम करायला सांगा, खरं तर त्यावेळेस मी राजकारणात नव्हते, पण दादांनी सूचना दिल्या आणि आम्ही सगळे कामाला लागलो, खऱ्या अर्थाने त्यानंतर राजकारणाला सुरुवात झाली, नंतर शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष, त्यावेळेस मी पहिल्यांदा मला आयोगाचे अध्यक्ष पद दिलं मी कुटुंबासह दादांना भेटायला गेले, त्यावेळेस दादा म्हणाले, तुला आयोगाचे पद मिळाले आहे, तुझ्याकडे कोणतीही तक्रार आली, मग ती व्यक्ती कोणती बघू नको, माणूस कोण ते आहे बघू नको, पक्ष बघू नको, तक्रारदार कोण आहे ते बघ आणि त्याचे प्रश्न सोडवं अगदीच माझ्याबद्दल कोणी तक्रार केली तर माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची नोटीस दे, हे वाक्य दादा अनेक वेळा आमच्या संघटनेच्या बैठकीत सुद्धा बोलले, अशी आठवण देखील चाकणकर यांनी सांगितली.(Rupali Chakankar)

दादांनी फोन केला आणि सांगितलं...

इतका पारदर्शकपणे काम करणारा माणूस कदाचित कोणी नसेल, आयोगाची जबाबदारी सांभाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं, 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेत साडेसात आठ कोटी महिला भगिनीचे प्रश्न सोडवताना, आयोगामध्ये फक्त काहीच कर्मचाऱ्यांचा स्टाफ होता ना कार्यालय होतं, ना विभाग होता, मी सुरुवातीला दादांकडे गेले आणि सांगितलं दादा अशी अशी परिस्थिती आहे, दादांनी तीन दिवसांनी मंत्रालयामध्ये सकाळी साडेसात वाजता बैठक बोलावली, आणि हे सगळे प्रश्न आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करून घेण्यापासून कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ सुविधा देण्यापर्यंत दादांनी काम केलं. चार वर्षे काम चालू राहिलं आणि गेल्या महिन्यामध्ये माझ्या आयोगाला आकृतीबंध मंजूर झाला.टीडीओ मिळाला. कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ सुविधा सुद्धा मिळाल्या. म्हणजे माझा आयोगा तीस वर्षांपूर्वीचा नाहीतर तो चार वर्षांपूर्वीच आहे. त्याला गती देण्याचं काम दादांनी केलं. खरंतर आयोगाच्या माध्यमातून काम करताना अनेक वेगळ्या टीका झाल्या, एका घटनेच्या संदर्भात माझ्या घरासमोर, कार्यालयासमोर दोन दिवस आंदोलन चालू होतं. दादांनी फोन केला आणि सांगितलं. रूपाली राजकारणात माणसाला यश मिळायला लागला की टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे झालेली टीका सहन करायला शिक, कोणत्याही प्रश्नांना उत्तर देऊ नको. त्यानंतर कधी मी कोणावर वैयक्तिक टीका केली नाही, आणि कोणाच्या टीकेला उत्तरही दिलं नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा हा माणूस होता

 दादांच्या माध्यमातून काम करत असताना अडीच वर्षांपूर्वी दादांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत होतो, दादांनी फोन केला आणि त्यांनी त्यांचा निर्णय सांगितल्यानंतर सांगितलं तुला महाराष्ट्रातील सगळ्या महिला भगिनींना सोबत घेऊन यावं लागेल, आम्ही शनमुखानंद सभागृहामध्ये प्रचंड मोठा मेळावा ठेवला, दादांनी त्याचे फारशी कल्पना नव्हती, की कार्यक्रम कसा असेल, पण ज्यावेळेस ते कार्यक्रमाला उतरले, त्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व जाती धर्माच्या महिला भगिनी त्यांच्या वेशभूषांमध्ये दादांचे स्वागत करायला उभे राहिल्या होत्या, त्यांनी फार कौतुक केलं. सभागृहांमध्ये येताना प्रचंड भरलेले सभागृह, बाहेर तितकीच गर्दी, रस्त्यावरही गर्दी, त्या दादांनी सभागृहांमध्ये भाषण करताना आवर्जून सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके मिळावे झाले, इतका सभा झाल्या, पण असं लाल वादळ मी कधी पाहिलं नाही, आमच्या संघटनेला ताकद दिली, आयोगाला ताकद दिली, खरं तर आठवणी खूप आहेत, या आठवणी आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेत, कारण की हा माणूस कामाचाच होता, सर्वसामान्यांमधला हा माणूस होता, काटेवाडीच्या मातीतून येऊन महाराष्ट्राच्या पटलावरती आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा हा माणूस होता, दादांचा निधन झालं आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं वाटलं, असंही पुढे त्या म्हणाल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.