Tere Naam Actress Bhumika Chawlas Emotional Moment: सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटातून प्रकाशझोतात येणारी अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला. 'तेरे नाम' चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. भूमिका चावला सोशल मीडियातही सक्रीय असते. तिचे अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. दरम्यान, अलिकडेच भूमिका चावलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती भरकार्यक्रमात रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या रडण्याचे कारण उघड झाले नसले तरी, साहजिकच चाहते चिंतेत आहेत. सध्या भूमिका चावलाचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भूमिका नेमकी का रडत आहे? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.
भूमिका चावलाचा तेलुगू चित्रपट 'युफोरिया' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात धुरंधर फेम अभिनेत्री सारा अर्जून मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा हैदराबादमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. ज्यामध्ये लहान मुलांमध्ये ड्रग्ज व्यसन आणि लैंगिक शोषण यांसारख्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वास्तववादी 'युफोरिया' या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.
View this post on Instagram
मुलाखतीदरम्यान, सर्वांनी चित्रपटात काम करतानाचे अनुभव शेअर केले. भूमिका चावला हिनं मुलाखतीत, 'युफोरिया' चित्रपटातील पात्र, अनुभव आणि कथेबद्दल माहिती दिली. या चित्रपटाचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला असल्याचं तिनं सांगितलं. "हा चित्रपट पाहिल्यानंतर मी रात्रभर झोपू शकले नाही. यामुळे मी इमोशलन झाले. या चित्रपटातील माझी भूमिका आव्हानात्मक होती. या चित्रपटातील पात्र साकारत असताना, रात्रीच्या वेळेस मी अचानक जागे व्हायची", असं भूमिकानं सांगितलं. यावेळी अभिनेत्री भावनिक झाली.
दिग्दर्शकाने भूमिकाला सांत्वन दिले. यावेळी भूमिका अश्रू पुसताना कॅमेऱ्यात कैद झाली. तिचा इमोशनल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. तिचा भावनिक क्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भूमिकाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून दु:ख व्यक्त केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
सुपरस्टार यशचा टॉक्सिक धुरंधरवर भारी पडणार? मार्च महिन्यात कोणता चित्रपट बाजी मारणार?