सिनेसृष्टीवर शोककळा! ह्रदयविकाराचा झटका अन् 'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचे निधन
भाग्यश्री कांबळे February 07, 2026 06:13 PM

Veteran nepali actor sunil thapa passes away at 68: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  ज्येष्ठ नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचं निधन झाले आहे.  वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार,  सुनील थापा यांना बेशुद्ध अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना  काठमांडूच्या थापाथली येथील नॉर्विक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुनील थापा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Everest Film Academy (@everestfilmacademy)

रूग्णालयाचे चेअरपर्सन राजेंद्र बहादुर सिंह म्हणाले की, "त्यांना बेशुद्ध अवस्थेत रूग्णालयात आणण्यात आले होते. सकाळी 7:44 मिनिटांनी त्यांचे निधन झाले.  त्यांना कार्डियक अरेस्ट आल्याची माहिती आहे. 

सुनील थापा यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक दशकांपासून नेपाळी, बॉलिवूड आणि भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  त्यांनी आतापर्यंत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. चीनो या चित्रपटातील राते कैला या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्यांनी खलनायिकाची भूमिका साकारली होती.

सुनील थापा यांनी आपल्या कारकि‍र्दीत बॉलिवूडसह वेब सिरीजमध्येही  काम केलं. मेरी कोम आणि द फॅमिली मॅन या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.  त्यांना मेरी कोम या चित्रपटासाठी फिल्मफेअर नामांकन देखील मिळालं होतं.  त्यांनी एक दुजे के लिए आणि आज की आवाज यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले.  सुनील थापा यांनी आपल्या कारकि‍र्दीत भोजपूरी चित्रपटांमध्येही काम केलं. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी सुनील एक मॉडेल आणि फोटो जर्नलिस्ट देखील होते.  त्यांनी 1970च्या दरम्यान मुंबईत मॉडेलिंग म्हणून आपल्या कारकि‍र्दीला सुरूवात केली होती.

सुनील थापा यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांनी पोस्टद्वारे त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

फिल्म इंडस्ट्रीत उड़ता पंजाब! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीसह दिग्दर्शक ताब्यात, 8 जण अटकेत

फिरायला जाणं जीवावर बेतलं, सावत्र वडिलांनी बॉलिवूड अभिनेत्रीसह संपूर्ण कुटुंबाला संपवलं अन् खड्ड्यात पुरलं, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.