ZP Elections 2026 voting Live update : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
Saam TV February 07, 2026 06:46 PM
Ratnagiri: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पाली नंबर 1 इथे बजावला मतदानाचा

सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचं मंत्री सामंत यांचं आवाहन

Evm मशीन काही ठिकाणी बंद पडण्याच्या घटना जरी घडल्या असल्या तरी मतदान न होण्याचा अन्याय कोणावर अन्याय होणार

जिल्हाधिकारी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत

काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील - उदय सामंत

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमध्ये एक-दोन ठिकाणी मशीन बदलल्या, मतदान शांततेत

छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू असताना एक दोन ठिकाणी मशीन बदलल्या असून या व्यतिरिक्त अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. एक-दोन ठिकाणच्या अफवा आम्हाला ऐकायला मिळाले असता आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करून पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

Pune ZP Election: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जवळपास 25 जागा मिळतील- आमदार विजय शिवतारे

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जवळपास 25 जागा मिळतील

पुरंदरमध्ये मी आमदार झाल्यानंतर अनेक विकास काम केली त्यामुळे या ठिकाणी आम्हाला चांगले परिणाम यश मिळेल.

निवडणुकीत लाडक्या बहिणीचा चागला इम्पॅक्ट आहे

या निवडणुकीत वन साइड मतदान होईल, आमदार विजय शिवतारेंना विश्वास

पुरंदरमध्ये १०५ वर्षीय रघुनाथ भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, वाल्हे नजिक भुजबळ कामठवाडी येथील १०५ वर्षीय रघुनाथ भुजबळ यांनी मतदान करून लोकशाहीप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. वयाच्या शंभरीनंतरही मतदानाविषयीचा उत्साह कायम ठेवत त्यांनी कुटुंबातील तीन पिढ्यांसह मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस सह अनेक राजकीय पक्षांची प्रतिष्ठापणा लागली आहे, मतदारांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता , लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा आव्हान अमित देशमुख यांनी केलं

कोरेगाव भीमामध्ये दोन फूट उंचीच्या मुलीने बजावला मतदानाचा हक्क

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे केवळ दोन फूट उंचीच्या निकीता मनीष गडिया (वय २१ वर्षे) हिने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला आणि सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरली.

दाबका येथे १०४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने बजावला मतदानाचा हक्क

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दाबका येथे लोकशाहीप्रती निष्ठेचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. येथील १०४ वर्षांच्या वयोवृद्ध महिला सयदाबी बाबन पटेल यांनी अत्यंत वृद्धावस्थेतही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या शंभराव्या वर्षानंतरही मतदान करण्याची जिद्द ठेवत त्यांनी लोकशाही प्रक्रियेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.

आमदार रोहित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी या आपल्या मूळ गावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी मतदान केलं. अंजली मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये रांगेत उभा राहत रोहित पाटील यांनी आजी भागीरथी पाटील यांच्या सोबत मतदान केलं . यावेळी रोहित पाटील यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी रोहित पाटील यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात जिल्ह्यात चांगली यश मिळेल असा आशीर्वाद व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 7.74 टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद प्रतिसाद

जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 7.74 टक्के मतदान

सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुमारास एकूण 7.74 टक्के इतके मतदान

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान

सर्वाधिक मतदान भोर तालुक्यात झाले . ८.७९ टक्के.

जुन्नर-७.४२ टक्के

आंबेगाव ८.५६ टक्के

शिरूर-७.२१ टक्के

खेड-७.६५ टक्के

मावळ -८.६३ टक्के

मुळशी-७.०३ टक्के

हवेली-७.७९ टक्के

दौंड-८.१२ टक्के

पुरंदर-८.१ टक्के

वेल्हे-७.९१ टक्के

बारामती-६.५२ टक्के

इंदापूर-७.६८ टक्के

मंत्री संजय बनसोडे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांनी लातूरच्या उदगीर तालुक्यातील मलकापूर येथे मतदानाचा हक्क बजावला आहे, यावेळी पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असा आव्हान देखील संजय बनसोडे यांनी केलं आहे.

मतदान केंद्रावर लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजी नगर शहरालगत असलेल्या पिसादेवी येथील मतदान केंद्रावर लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

कृष्णा तायडे असं या नवरदेवाच नाव असून आज पार पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी माळशिरस तालुक्यातील शंकरनगर येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड इथं शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी बोटावर शाई लावून घेतली. सोबतच त्यांचा लहान मुलगा अधिकाऱ्यांनी शाही लावली. यावरून टीका होत असतानाच खासदार संदिपान भुमरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मतदानासाठी कुटुंबासहित जात असतात, पण तिथे नेमकं काय घडलं मला माहित नाही असं नाही भुमरे म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे इंदापूर तालुक्यातील बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी बावडा गटातून निवडणूक लढवीत असणाऱ्या अंकिता पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदाराने मतदानाचा हक्क बजावत लहान मुलाच्या बोटाला लावली शाई!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड इथं शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी बोटावर शाई लावून घेतली. सोबतच त्यांचा लहान मुलगा अधिकाऱ्यांनी शाही लावली.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानावेळी मार्कर पेनने शाई लावल्याने राज्यभर गोंधळला झाला होता. आता लहान मुलाच्या बोटावर शाई का लावली याची चर्चा आता सुरू झालेली आहे. मतदान प्रक्रिया ही गंभीरपणे घेतली पाहिजे पण मतदान केंद्रामध्ये अख्खी फॅमिली जाऊन बोटावर ज्याला वाटेल त्याला शाई लावली कशी जाते असे एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

27 वर्ष नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेली जिल्हा परिषद ह्यावेळी सुद्धा महायुतीच्या माध्यमातून विजयी होणार नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

विरोधक नाउमेद झाल्याने हि निवडणूक एकतर्फी होणार- नितेश राणे

लग्नाच्या मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन नववधूने केले मतदान

आधी लगीन लोकशाहीचं,अशी भावना घेऊन लग्नाच्या बोहल्यावर चढण्या आधी मतदानाचा हक्क बजावला आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कापूस खेड येथे लग्न मंडपात जाण्याआधी तृप्ती पाटील या नववधूने मतदान केंद्रावर जात, मतदान केलं आहे.तृप्ती पाटील हिचे आज लग्न पार पडत आहे,लग्नाच्या दिवशीचं मतदानाचा दिवस असल्याने तृप्तीने मंडपात दाखल होण्याच्या आधी मतदान करणे पसंत करत,वडिलांसह मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यामुळे तृप्ती पाटील हिचे कौतुक होत आहे.

कोल्हापूर ग्रामीण भागात मतदानासाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी

आज सकाळपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी चुरशीन मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ही मतदान प्रक्रिया होत असल्याने आज सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी अनेक केंद्रांवर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगनूर इथं गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आपल्या मतदानाचा हक्कही बजावलेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केलेली आहे.

ZP Election Voting: शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

परंडा तालुक्यातील मुगाव येथे बजावला मतदानाचा हक्क

जिल्ह्यात शिवसेनेला मतदारांच्या जोरावर शिवसेनेला चांगलं यश मिळेल विश्वास

अध्यक्षपदाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जे सांगतील तो निर्णय घेणार आमदार तानाजी सावंत

धाराशिव जिल्ह्यात भाजप व शिवसेना पक्षाने अद्यक्ष पदा वर केला आहे.

तानाजी सावंत यांनी पुन्हा दावा सांगत पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मान्य करणार

ZP Election: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी मध्ये केले मतदान..

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी मतदान केलं. कार्यकर्त्यांसमवेत मतदान केंद्रावर जात पडळकर यांनी आपलं मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समिती साठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Latur: लातूरमध्ये बोहल्यावर चढण्या आधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

लोकशाहीच्या सणाला प्राधान्य देत लातूरच्या गरसुली येथे एका नवरदेवाने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाआधी मतदानाचा हक्क बजावल्याचे प्रेरणादायी चित्र आज पाहायला मिळाले. लग्नसोहळ्यासाठी भोल्यावर चढण्याआधी नवरदेव थेट मतदान केंद्रावर पोहोचला आणि आपला मतदानाचा हक्क बजावला .

लग्नाची धामधूम, नातेवाईकांची वर्दळ आणि शुभमुहूर्ताची घाई असतानाही “आधी मतदान, मग लग्न” हा संदेश देत नवरदेवाने समाजासमोर आदर्श ठेवला. मतदान करून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

या अनोख्या कृतीचे मतदान केंद्रावर उपस्थित अधिकारी व नागरिकांनी कौतुक केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे, असा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.

Jaynati Patil: आमदार जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क...

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावा मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.रांगेत उभे राहुन आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल,असं मत यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केले.

Malshiras: माळशिरस तालुक्यात चुरशीने मतदान

माळशिरस तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे अकलूज जवळच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे.

तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा एकदा माजी आमदार राम सातपुते आणि आमदार उत्तम जानकर आमने-सामने आले आहेत येथून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते व आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांच्यामध्ये सर लढत होत आहे येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Latur: बाभळगाव येथे देशमुख कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीला सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे, लातूरच्या बाभळगाव येथे देशमुख कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला , यावेळी, स्वर्गी विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख,काँग्रेस नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख यांनी त्यांच्या मूळ गावी बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान करण्याचा अहवाल देखील यावेळी करण्यात आलं

Rohit Pawar: रोहित पवारांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क

रोहित पवार मतदान केंद्रावर दाखल

मतदानाचा हक्क बजावला

सुनंदा पवार, राजेंद्र पवार, कुंती पवार, मतदानासाठी दाख

Chhatrapati Sambhaji Nagar: खासदार संदिपान भुमरे यांनी पाचोड येथे बजावला मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या गावी पाचोड येथे मतदानाचा हक्क बजावला. पाचोड येथील जिल्हा परिषद गटात त्यांचे पुतणे शिवराज भुमरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. खासदार संदिपान भुमरे यांच्यासाठी पैठण तालुक्यातील पाचोड जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरलेली आहे.

पुण्याच्या भोरमधील भाजप नेते संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुण्याच्या भोरमधील भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सपत्नीक मतदान केंद्रावर येत बजावला मतदानाचा हक्क..

भोर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी हातनोशी येथील मतदान केंद्रावर येऊन पत्नी स्वरूपा थोपटे यांच्यासह येत मतदानाचा हक्क बजावलाय..

माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे ह्या भोरमधील उत्रौली - कारी गटातून जिल्हा परिषद निवडणूकी साठी रिंगणात आहेत..

यंदा पहिल्यांदाचं त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत..राष्ट्रवादीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवत आहेत..

तर पत्नी जरी पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या असल्यातरी थोपटे कुटुंब अनेकवेळा निवडणूकांच्या रिंगणात उतरले आहेत.. त्यामुळे ही निवडणूक थोपटे कुटुंबासाठी नवीन नाही....

त्यामुळे ही लढत त्याच्या अतिशय चुरशीची होणार आहे .

Pandharpur: पंढरपुरच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद...

पंढरपुरच्या माळशिरसच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद......

सुमारे 40 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले होते.....

मतदार रांगेत ताटकळत उभारले.......

जवळपास 40 मिनिटांनी बंद पडलेले ईव्हीएम मशीन सुरू झाले.....

Ratnagiri: रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील सती चिंचघरी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद

रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील सती चिंचघरी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद

चिपळूण अलोरे जिल्हा परिषद गटातील प्रकार

गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प

नवीन मशीन आली मागवण्यात

ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क..!

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

Parbhani: परभणीत मतदान करण्यासाठी रोखल्याने परभणी मध्ये मतदान केंद्रावर वाद

परभणीच्या राणीसावरगाव मध्ये मतदान करण्यापासून रोखल्यामुळे मतदान केंद्रावर वाद झाला आहे महंतांनी थेट मतदान केंद्र अधिकार्यावर भाजपाची दलाली करत असून आपल्याला मतदानापासून रोखले असल्याचा आरोप केलेला आहे यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील हा वाद चालूच होता दरम्यान महंत मतदान न करताच मतदान केंद्रावरून बाहेर पडले आहेत दरम्यान हा वाद सकाळी सकाळी झाला असल्याने चर्चेला उधाण आले आहेव

Karad: कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरुच नाही

कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होईना

सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर

बुथ क्रमांक 78 वरील मशीन बंद

काँग्रेस आणि भाजप उमेदवार या ठिकाणी मोठी चुरस

मतदान केंद्रावर झोनल अधिकारी दाखल

Chhtrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक 15 मधील इव्हीएम बंद

छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक 15 मधील खोली क्रमांक पाच मध्ये असलेले ईव्हीएम मशीन बंद

ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदानाला सुरुवात नाही

सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड

मतदान सुरुवात न झाल्यामुळे बुध क्रमांक पंधरा वरील खोली क्रमांक पाच बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा

अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी तयारी सुरू

Raigad: रायगडच्या अलिबाग मध्ये मतदान यंत्रात बिघाड

रायगडच्या अलिबाग मध्ये मतदान यंत्रात बिघाड

सहाण येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बिघाड

8 वाजले तरी मतदान सुरू नाही

यंत्र दुरुस्तीसाठी टेक्निकल टीमला पाचारण करण्यात आले आहे

सकाळ पासून इथ मतदारांच्या रांगा, मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत

Pandharpur: पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदानाला सुरुवात

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि 11 पंचायत समितीच्या 145 जागांसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणासाठी ही मतदान सुरू झाले आहे. पंढरपुरात 309 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी 1700 कर्मचारी तैनात आहेत. पंढरपूर तालुक्यात सुमारे 2 लाख 85 हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चुरस आहे.

Maval: मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी मतदान

जिल्हा परिषद पाच आणि पंचायत समिती दहा जागांसाठी एकूण 15 उमेदवारांसाठी आज मावळ मध्ये मतदान संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेसात वाजता पासूनच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केलेली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या विश्वासावरच आम्हाला मायबाप जनता निवडून देईल असा आत्मविश्वास भागवत यांनी व्यक्त केला..

ZP Election: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत पुन्हा शाईचा वापर

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत पुन्हा शाईचा वापर

महापालिकेत मार्कर पेनने लावलेली शाई पुसल्याचे प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक विभागाचा निर्णय

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज पार पडतेय मतदान प्रक्रिया

मतदान प्रक्रियेत मार्कर पेन वर बंदी करून शाईचा वापर सुरू केल्याने मतदारांनी केलं स्वागत स्वागत

Parbhani: परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद गट आणि 108 पंचायत समिती मतदानाला सुरुवात

परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद आणि 108 पंचायत समिती गाण्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या साठी प्रशासन सज्जन झाले आहे .कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

54 जागेसाठी 247 उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या 108 गणा साठी 433 उमेदवार रिंगणात आहेत जिल्हापरातील 1278 केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे सकाळी 7:30 पासून 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार असून या सर्व उमेदवाराचे भवितव्य आज मतदानाच्या रूपात मत पेटी मध्ये बंद होणार आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान सुरू

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले असून मतदार केंद्रावर काही प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मीळत आहेत मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून १०० मीटरच्या बाहेर वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ५० व पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ही निवडणूक होत असली तरी 8 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर पंचायत समितीचे 17 सदस्य निवडून आले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 42 तर पंचायत समितीच्या 83 जांगासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

पिंपळी मतदान केंद्रावर रोहित पवार थोड्याच वेळात करणार मतदान

पिंपळी या मतदान केंद्रावर , रोहित पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार हे करणार पिंपळी या ठिकाणी मतदान

Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

1308 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया तर 11 लाख 45 हजार 888 मतदार बजावणार हक्क

जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी 234 उमेदवार रिंगणात तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 393 उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त,

Sangli: सांगली जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज..

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदाना प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे. 61 जिल्हा परिषद गटासाठी 211 आणि 122 पंचायत समिती गणासाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18 लाख 18 हजार 742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली .

Shrinivas Pawar: श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार मतदानासाठी काटेवाडीत दाखल

श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार मतदान करण्यासाठी काटेवाडी मध्ये दाखल

बजावणार जिल्हा परिषदेच्या मतदानाचा अधिकार

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काटेवाडीत बजावणार मतदानाचा हक्क

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काटेवाडीत बजावणार मतदानाचा हक्क

बारामती मध्ये यंदा मतदान अजित दादांच्या विना

उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पहिलं मतदान

सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य बजावणार काटेवाडी मध्ये निवडणूक

Raigad: आज रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच मतदान

आज पार पडणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून. रायगड जिल्ह्यात एकूण 17 लाख 381 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 2323 मतदान केंद्र तैनात करण्यात आली आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीकरिता 59 जागांसाठी 173 उमेदवार रणांगणात असून पंचायत समिती साठी 118 जागांकरिता 329 उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यासाठी 12 हजार हून अधिक शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झालेत.

ZP Election: आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात उमेदवाराच्या यजमानावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या यजमानावर जीवघेणा हल्ला

पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या यजमानावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता

या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात असून, हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले.

Baramati ZP Election: बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान

बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान

जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२

जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार

सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात

पुणे, सोलापूरसह १२ जिल्हा परिषद 125 पंचायत समितीसाठी मतदान

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान

जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा

सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत करता येणार मतदान

एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश

अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुका

प्रचार, भव्य सभा, रॅली किंवा शक्तिप्रदर्शन न होता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली

तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी मात्र तालुक्यात दुःखद वातावरण

काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे

अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक अपक्षांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत पाठिंब्याची पत्रे राष्ट्रवादीला सादर केली

मतदारांचा कौल कोणाला असणार याकडे साऱ्यांचे लक्ष

बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान

बारामती जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२

,

जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार

सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.