या वर्षी व्हॅलेंटाईन डे वर शनीचा प्रभाव, तर प्रेमी युगुलांनी चुकूनही करू नये 'या' चुका
Tv9 Marathi February 07, 2026 07:46 PM

अलीकडच्या काही वर्षापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. एवढेच नाही तर काही प्रेमी युगुल या दिवसाची वाट पाहतात आणि तो उत्साहाने साजरा करतात. परंतु यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे वेगळा आणि खास असेल. कारण यावर्षी व्हॅलेंटाईन डे शनिवारी येतो, आणि या दिवशी शनि त्रयोदशी ही तिथी आहे. ज्योतिष आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये शनिदेवाला न्याय आणि कर्माचे फळ देणारा देव मानला जातो.

तथापि यावर्षी शनीच्या त्रयोदशी तिथीमुळे व्हॅलेंटाईन डे वर प्रेमाचा मार्ग कठीण होणार आहे. ज्योतिषांच्या मते, यावर्षी व्हॅलेंटाईन डे वर जुने वाद, मतभेद किंवा खोटी आश्वासने समोर येऊ शकतात. मजबूत नातेसंबंध टिकतील, परंतु नवीन किंवा कमकुवत नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणून व्हॅलेंटाईन डे च्या शनिवारी जोडप्यांनी काही चुका टाळल्या पाहिजेत. चला तर मग कोणत्‍या चुकां टाळाव्यात ते जाणून घेऊयात.

व्हॅलेंटाईन डे ला या चुका करू नका

चामड्याची आणि धारदार वस्तू भेट देणे टाळा

व्हॅलेंटाईन डे ला महागड्या भेटवस्तू दिल्या जातात, पण या दिवशी चामड्याची वस्तू किंवा धारदार वस्तू गिफ्ट म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीला देऊ नका. त्याऐवजी निळे रत्न, स्टील किंवा आध्यात्मिक वस्तू भेट द्या. याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही.

मद्यपान किंवा मांसाहार जेवण टाळा

हिंदू मान्यतेनुसार शनि त्रयोदशीला मद्यपान किंवा मांसाहार जेवण केले जात नाही. म्हणून या दिवशी शाकाहारी अन्नपदार्थांचे सेवन करा. यामुळे तुमच्या नात्यात स्थिरता येईल.

खोटेपणा आणि फसवणूक टाळा

खोटेपणा आणि फसवणुकीच्या परिस्थितीत शनिदेवाची प्रतिक्रिया तात्काळ असते. काही काही खोटेपणा किंवा एखादी गोष्ट लपवल्याने तुमच्या नात्यात संघर्ष निर्माण होईल म्हणून तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे बोला.

मोठी आश्वासने देऊ नका किंवा घाईघाईने कामे करू नका

या दिवशी मोठी आश्वासने देणे किंवा घाईघाईने निर्णय घेणे टाळा. या व्हॅलेंटाईन डे ला, दानधर्म आणि चांगल्या कामांमध्ये सहभागी व्हा. यामुळे नातेसंबंधांमध्ये स्थिरता येईल. शनीची वाईट नजर टाळण्यासाठी संयम, सत्यता आणि नीतिमत्ता अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.