India-US Trade Deal : भारतासाठी मोठी GOOD NEWS, अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं, काश्मीरचा संदर्भ
Tv9 Marathi February 07, 2026 07:46 PM

भारत आणि अमेरिकेमध्ये बऱ्याच महिन्यांपासून रखडलेली ट्रेड डील अखेर फायनल झाली आहे. या अंतरिम ट्रेड डीलच्या फ्रेमवर्कची घोषणा झाली आहे. या डीलमध्ये काय-काय आहे? भारताला काय मिळणार? अमेरिकेला काय मिळणार? ते समोर आलय. या ट्रेड डीलसोबतच अजून एक गोष्ट घडलीय. त्याने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय. ट्रम्प प्रशासनाने भारताचा नकाशा प्रसिद्ध केलाय. हा नकाशा पाहून पाकिस्तान खूपच अस्वस्थ झाला आहे. कूटनितीच्या विश्वात एक नवीन वाद सुरु झालाय. ट्रेड डीलची माहिती देताना अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेजेंटेटिव ऑफिसने भारताचा अधिकृत नकाशा प्रसिद्ध केलाय. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनला भारतामध्ये दाखवलय. हे एक अस पाऊल आहे, जे अमेरिकेच्या जुन्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे.

भारताच्या क्षेत्रीय अखंडतेला कधीच दुसऱ्या देशाच्या मान्यतेची गरज राहिलेली नाही. जम्मू-काश्मीर आमचं अविभाज्य अंग आहे हे भारताने नेहमीच स्पष्ट केलय. अमेरिकेने असा नकाशा जारी करुन पाकिस्तानला एक मजबूत राजनैतिक आणि कूटनितीक संदेश दिल्याचं बोललं जातय. आतापर्यंत अमेरिकी परराष्ट्र विभाग आणि अन्य अधिकृत एजन्सीद्वारे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या नकाशात POK बद्दल स्पष्ट सीमांकन दाखवलं जायचं. जेणेकरुन भारत-पाकिस्तान संबंधात संतुलन साधता येईल. आता ट्रम्प प्रशासनाने जारी केलेला ताजा नकाशा म्हणजे पाकिस्तानच्या दाव्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

टायमिंग खूप महत्वाचा

नकाशाचा रिलीज करण्याचा टायमिंग खूप महत्वाचा आहे. 50 टक्के टॅरिफमुळे बिघडलेले भारत आणि अमेरिकेचे संबंध आता पुन्हा नव्याने भक्कम होत आहेत. पाकिस्तानसाठी हा सुद्धा एक धक्का आहे. अमेरिकेने त्यांच्या मित्र देशांमध्ये भारतावरच सर्वाधिक 50 टक्के टॅरिफ लावला होता. आता तो थेट 18 टक्के केलाय. त्याचवेळी रशियाकडून तेल खरेदीसाठी आकारण्यात येणारा अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवला आहे.

भारत आणि चीनमध्ये याच मुद्यावरुन तणाव

या नकाशातील सर्वात महत्वाची बाब ही आहे की, अक्साई चीनला भारताचा भाग दाखवलं आहे. हा तोच भाग आहे, ज्यावर चीन दीर्घकाळापासून आपला दावा सांगत आहे. भारत आणि चीनमध्ये याच मुद्यावरुन तणाव आहे.

भारताने अनेकदा आक्षेप नोंदवलेला

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधी अनेकदा जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला नकाशात चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल अमेरिका आणि अन्य जागतिक संस्थांकडे आक्षेप नोंदवला होता. ट्रम्प प्रशासनाने हे आक्षेप स्वीकारुन त्यात दुरुस्ती केल्याच नव्या नकाशातून दिसून येतय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.