बांग्लादेशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी युनूस सरकारने ट्रेड डिप्लोमसी क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरु केलाय. भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानने बांग्लादेशसोबत आर्थिक भागिदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. जपान सोबतच्या या भागिदारीमध्ये बांग्लादेशचा डबल फायदा आहे. त्यांना फक्त कर मुक्त व्यापारच नाही, तर गुंतवणूक, टेक्नोलॉजी, सर्विसेजमध्ये ट्रेड आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये दीर्घकालिन रणनितीक सहकार्याचे सुद्धा दरवाजे उघडले जाणार आहेत. एक्सपर्ट्सनुसार, बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक योग्य निर्णय असून भविष्यात त्याचे फायदे दिसून येतील. जपानची राजधानी टोक्योमध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कराराच्यावेळी बांग्लादेशी शिष्टमंडळात व्यापार मंत्रालयाचे चार अधिकारी होते. यात एडिशनल सेक्रेटरी आणि फ्री ट्रेड एग्रीमेंट डिवीज़न हेड आयशा अख्तर, जॉइंट सेक्रेटरी फिरोज उद्दीन अहमद, डेप्युटी सेक्रेटरी महबूबा खातून मीनू आणि सीनियर असिस्टेंट सेक्रेटरी मोहम्मद हसीब सरकार होते.
एग्रीमेंट फक्त चार वर्षात पूर्ण
बांग्लादेश-जापान इकॉनमिक पार्टनरशिप एग्रीमेंट फक्त चार वर्षात पूर्ण झालाय. इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या हिशोबाने हा फार कमी वेळ आहे. आर्थिक संबंधांसाठी फ्रेमवर्क तयार करण्याची जबाबदारी होती. डिसेंबर 2023 मध्ये टीमच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या. 12 मार्च 2024 रोजी औपचारिक चर्चा सुरु झाली. 2024 आणि 2025 मध्ये ढाका आणि टोक्यो येथे चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या. टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बाधा, इन्वेस्टमेंट प्रोटेक्शन, सर्विस सेक्टर, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, लेबर आणि एनवायरनमेंटल स्टँडर्ड आणि पुरवठा साखळीचं ऑपरेशन्स या मुद्दांवर चर्चा झाली.
चर्चा पूर्ण झाल्याची घोषणा
ड्राफ्ट एग्रीमेंट सप्टेंबर 2025 मध्ये फायनल करण्यात आलं. मागच्यावर्षी 22 डिसेंबरला बांग्लादेशचे कॉमर्स एडवायजर शेख बशीरुद्दीन आणि जापानचे परराष्ट्र मंत्री इवाओ होरी यांनी एकत्रितपणे चर्चा पूर्ण झाल्याची घोषणा केली.
बांग्लादेशच्या किती उत्पादनांना करमुक्त एन्ट्री?
या कराराबद्दल बांग्लादेशच्या व्यापार मंत्रालयाने माहिती देताना सांगितलं की, पहिल्यादिवसापासून बांग्लादेशच्या 7,379 उत्पादनांना जपानमध्ये कर मुक्त प्रवेश मिळेल. जपानच्या 1,039 उत्पादनांना असाच फायदा बांग्लादेशमध्ये मिळेल. रेडीमेड गारमेंट्स याची बांग्लादेशकडून मुख्य निर्यात होते. बांग्लादेशी कपडे जपानमध्ये करमुक्त असतील.
बांग्लादेशचा फायदा काय?
दोन्ही देशांनी सर्विस सेक्टरमध्ये परस्परांना बरीच आश्वासन दिली आहेत. बांग्लादेश जपानसाठी 97 सब-सेक्टर उघडे करायला तयार झालाय. जपान चार मॅकेनिज्मद्वारे बांग्लादेशासाठी 120 सब-सेक्टर ओपन करेल. या करारामुळे बांग्लादेशात जपानी गुंतवणूक, टेक्नोलॉजी ट्रान्सफर आणि स्किल्ड ह्यूमन रिसोर्सच्या विकासात वेग येण्याची अपेक्षा आहे.