अलिबाग : सुतारपाडा येथिल केंद्रावर पोलीस बंदोबस्त
esakal February 08, 2026 02:45 AM

सुतारपाडा मतदान केंद्रावर शेकाप-शिंदे गटात वाद
अलिबाग ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान शांततेत पार पडले. या वेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला; परंतु सुतारपाडा मतदान केंद्रावर शेकाप व शिंदे गटात शाब्दिक वाद झाल्याचे समोर येत आहे.
तालुक्यातील सुतारपाडा मतदान केंद्रावर शेकाप व शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते; परंतु दोन्ही गटांनी आपपसांत वाद मिटवल्याने वातावरण निवळले. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी मतदान केंद्रावर पोलिस आणि एसआरपीएफ यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.