'ईव्हीएम' बिघाडाने गव्हाण येथे खोळंबा
esakal February 08, 2026 11:45 AM

‘ईव्हीएम’ बिघाडाने
गव्हाण येथे खोळंबा
म्हापण ः म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातील परुळे पंचायत समिती मतदारसंघात गव्हाण मतदान केंद्र ४६ या ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. सकाळच्या सत्रात या ठिकाणी शांतपणे मतदान चालू असताना अचानक ईव्हीएम मशीनमधील बटण दाबत नसल्याने मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मतदान प्रक्रियेत काही वेळ खंड पडला. यावेळी जवळपास २० टक्के मतदान झाले होते. सकाळपासून उत्स्फूर्तपणे मतदान चालू होते; परंतु अचानक ईव्हीएम मशीन बंद पडल्याने धावपळ झाली. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी नवीन मशीन लावून पुन्हा एकदा सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरळीत केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.