सरसंघचालक कोण बनू शकते? मोहन भागवत यांनी दिले एका शब्दात उत्तर, म्हणाले, एसटी आणि एससीही..
Tv9 Marathi February 08, 2026 04:45 PM

नुकताच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान केले. मोहन भागवत यांनी सध्याच्या परिस्थिवीर आपले मत मांडले. जिभेखाली दात आले म्हणजे लोक जिभ कापत नाहीत. संघ सांगेल तेंव्हा निवृत्ती घेईल पण निवृत्तीनंतरही काम सुरू ठेवले. संघाचा सरसंघचालक हा फक्त हिंदूच असेल. मग तो एससी किंवा एसटीचाही असू शकतो. मुळात म्हणजे भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नाही तर मनात असतो. आधी विरोध होतो आणि मग विचार ऐकला जातो. पाण्यात मासे पाणी कसे पितात हे कळत नाही. सरकारी कर्मचारी पैसे कसे खातात हे कळत नाही. विदेशी लोकांना रोजगार द्यायचा नाही. आपल्या देशातील मुस्लिम असेल तर त्याला रोजगार द्या पण विदेशी लोकांना काम देणे टाळले पाहिजे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

सरसंघचालक कोण बनणार या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडताना मोहन भागवत दिसले. मोहन भागवत यांनी बोलताना म्हटले की, सरसंघचालक कोण बनणार? तर कोणीही ब्राम्हण हा सरसंघचालक बनू शकणार नाही. तर जो हिंदू आहे तोच बनणार. मग तो एसटी किंवा एससी किंवा अजून कोणी असेल तरीही बनू शकतो. हे बघून आमच्याकडे कार्यकर्त्याची नियुक्ती केली जात नाही.

पुढे मोहन भागवत यांनी म्हटले की, संस्कार करण्याचे काम संघ करतो. सर्व शास्त्र आपल्याला सांगतात की, एका कुटुंबामध्ये तीन मुले असवीत. पण शेवटी हा त्या दोन व्यक्तींचा आणि त्या कुटुंबातील निर्णय आहे. हा समाजाचाही प्रश्न आहे. नक्कीच तुम्ही तुमचा देव निवडू शकता.

दोन दिवस झाले. तेच संघाचे काम करतो. आम्ही म्हणतो, प्रत्यक्ष पाहा. संघाचे विरोधक होते. ते मला भेटायला आले. त्यांना मी सर्व सांगितलं. तरीही त्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले, असाही एक अनुभव मोहन भागवत यांनी सांगितला. नुकताच आरएसएसच्या कार्यक्रमाला सलमान खान यानेही हजेरी लावल्याचे बघायला मिळाले. ज्याचे काही फोटोही पुढे आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.