2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
अभिषेक मुठाळ February 08, 2026 05:13 PM

पुणे मंडळाच्या या सोडतीला सर्वसामान्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. एकूण 4,186 सदनिकांसाठी 2,58,832 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2,15,965 अर्जदारांनी विहित मुदतीत अनामत रकमेचा (EMD) भरणा केला असून, केवळ याच पात्र अर्जदारांचा समावेश उद्याच्या अंतिम सोडतीत केला जाणार आहे.

पुणे, पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3322 सदनिकांचा आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिकांचा सोडतीत समावेश करण्यात आला आहे. अर्जदारांच्या विनंतीनुसार, काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.

ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी म्हाडाने ऑनलाईन प्रक्षेपणाची सोय केली आहे. अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात आली आहे. तसेच, म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर (https://youtube.com/live/QTmRzDT_NbA?feature=share) दुपारी 12 वाजल्यापासून ही सोडत थेट पाहता येईल. जास्तीत जास्त अर्जदारांनी या पारदर्शक प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Amol Mitkari on Ajit Pawar plane crash: अजित पवारांच्या विमानात आत्मघाती बॉम्बर, पायलट संमोहनाच्या अवस्थेत? अमोल मिटकरींचं खळबळजनक वक्तव्य

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.