बारामती: एकीकडे आज जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत, या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवारांशिवायची ही पहिली निवडणूक पार पडत आहे, अशातच शरद पवारांना (Sharad Pawar) गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्या काही लोकांना न भेटताच परतावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांचे पथक गोविंदबागेत दाखल झाले आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) खोकला येत असल्याने त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी डॉक्टरांनी तपासणी केली आहे. यामुळे शरद पवारांना भेटण्यासाठी आलेल्या काही लोकांना भेटीविना परतावे लागले आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास होतोय अशी माहिती आहे. शरद पवार काटेवाडीत जाणार का याकडे लक्ष लागले आहे.(Sharad Pawar)
बारामतीत आज जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लगालं असतानाच शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर गोविंद बाग येथे सकाळपासून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांची गर्दी होती. मात्र डॉक्टरांच्या तपासणीमुळे भेटी मर्यादित ठेवल्या गेल्याने अनेकांना न भेटताच परतावे लागले. त्यामुळे गोविंद बाग परिसरात काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.(Sharad Pawar)
दरम्यान, शरद पवार आज काटेवाडी येथे जाणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष आहे. निकालानंतर पवार यांची भूमिका, कार्यकर्त्यांशी संवाद आणि पुढील राजकीय दिशा काय असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः अजित पवारांशिवाय झालेल्या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत निकाल काय लागतात, यावर पुढील राजकीय गणिते ठरणार असल्याने पवार यांचे प्रत्येक पाऊल आणि हालचाल महत्त्वाची मानली जात आहे. (Sharad Pawar)