अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हात
Marathi February 09, 2026 02:25 PM

झेडपी निवडणूक निकाल 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026) मतमोजणी सुरु झाली आहे.12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगडरत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणेसातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 200 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- 70, शिवसेना शिंदे गट- 38, राष्ट्रवादी अजित पवार गट- 43, काँग्रेस- 21, शिवसेना ठाकरे गट- 6, राष्ट्रवादी शरद पवार गट- 3, इतर- 11 जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी-

भाजप- 70
शिवसेना शिंदे गट- 38
राष्ट्रवादी अजित पवार गट- 43
काँग्रेस- 21
शिवसेना ठाकरे गट- 14
राष्ट्रवादी शरद पवार गट- 3
इतर- 11

महायुतीच्या 27 जागा बिनविरोध- (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Winner Candidate List 2026)

कोकणात महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलं आहे. रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Winner Candidate List 2026)

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: मतमोजणीला सुरुवात, पहिला कल हाती; कुणाची सरशी? सर्व अपडेट्स एका क्लिकवर…

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.