जयशंकर यांनी ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली
Marathi February 09, 2026 03:26 PM

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत-ग्रीसमधील संरक्षण आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ग्रीक संरक्षणमंत्री निकोस डेंडियास यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा केली. जयशंकर यांनी सोशल मीडियावर ही बैठक फलदायी असल्याचे जाहीर करताना ग्रीसने सुरक्षा मुद्यांवर केलेल्या मूल्यांकनाचे कौतुक केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निमंत्रणावरून डेंडियास भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीत डेंडियास यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. दिल्लीनंतर ते बेंगळूरलाही भेट देऊन ग्रीस आणि भारतीय संरक्षण उद्योगांमधील सहकार्याच्या शक्यतांचा आढावा घेतील. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर काही आठवड्यांनी ही भेट होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.