ZP Panchayat Samiti Election Result LIVE : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींचे निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार
Sarkarnama February 09, 2026 04:45 PM
अजित पवार त्यांच्या तेराव्याचा विधी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच आज अजित पवार त्यांच्या तेराव्याचा विधी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील पवार फार्म या निवासस्थानी पार पडत आहे. संपूर्ण पवार कुटुंब नातेवाईक या ठिकाणी या विधीसाठी दाखल झाले आहेत. महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध विजयी

Maharashtra ZP Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज (ता. 09) जाहीर होणार आहे. या निकालाकडे उमेदवारांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कोकणात महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.

कोल्हापूर झेडपी आणि 12 पंचायत समित्यांच्या मतमोजणीला 10 पासून सुरूवात होणार

Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी 74.45 टक्के मतदान झाले आहे.

बारामतीतील निकालाकडे सर्वांच्या नजरा

अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीमधील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणाच्या मतमोजणीत कोण विजयी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ZP Panchayat Samiti Election Result LIVE : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींचे निकाल आज जाहीर होणार

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे उमेदवारांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. तर सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.