Silver Rate Today : जगभरात आणि भारतात सोन्याच्या भाव पुन्हा तेजीत आली आहेत. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं-चांदीचे भाव वाढले. डॉलर कमकुवत झाल्याने आणि स्पॉट मार्केटमध्ये चांगली मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली.
Goodreturnच्या आकडेवारीनुसार, आज राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2,240 रुपयांनी वाढला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,990 रुपये आहे. तर 22 कॅरेटचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,45,750 रुपये आहे.
EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! आता फक्त 8 दिवसांत मिळणार PF चे पैसे! काय आहे नवीन अपडेट? जाणून घ्या सर्व माहिती चांदीचा भावदिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदी 15,000 रुपयांनी महागली असून भाव प्रति किलो 3,00,000 रुपये झाला आहे. दिल्ली इतकाच भाव मुंबई, कोलकाता, आणि पुणे शहरांमध्ये आहे.
MCX बाजारातील भावMCX वर सोन्याचा भाव आज 3,000 रुपयांपेक्षा जास्त वाढून प्रति 10 ग्रॅममागे 1,58,500 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीच्या भावातही मोठी उसळी पाहायला मिळाली. चांदीचे बाव 15,000 रुपयांनी म्हणजेच जवळपास 6% वाढून 2,64,885 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
Provident Fund : VPF नेमकं काय आहे? कर वाचविण्यासाठी आणि रिटायरमेंटसाठी बेस्ट पर्याय? जाणून घ्या VPF गुंतवणुकीविषयी सर्व काही राज्यातील भावआज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर,आणि जळगाव येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,58,840 रुपये आहे तर 22 कॅरेटचा भाव 1,45,600 रुपये आहे. त्यासोबतच चांदीचा भाव प्रति किलो 3,00,000 रुपये आहे.