छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar Accident News)चिकलठाणा परिसरात भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे, बेजबाबदार कंटेनर चालकाच्या भरधाव वेगाने एका तरुण दुचाकी स्वाराचा बळी गेला आहे. चिकलठाणा येथील आठवडी (Chhatrapati Sambhajinagar Accident News)बाजारासमोर मागून आलेल्या कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत शहाबाज कमरोद्दीन बागवान या तरुणाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. नारेगावच्या अजीज कॉलनीत राहणारे शहाबाज हे चिकल ठाण्यातील जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री दुकानात फायनान्सचे काम करत होते. मिनी घाटीकडून केम्ब्रिज चौकाच्या दिशेने जात असताना कंटेनरने त्यांना चिरडले. शहाबाज यांच्या पश्चात पत्नी, दोन आणि चार वर्षांची दोन मुले तसेच सहा महिन्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.(Chhatrapati Sambhajinagar Accident News)
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी काही काळ चिकलठाणा परिसरात गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. कंटेनरसारख्या जड वाहनांच्या भरधाव वेगामुळे सातत्याने अपघात घडत असतानाही वाहतूक नियंत्रण आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः आठवडी बाजारासमोर नेहमीच गर्दी असते, तरीही जड वाहनांना वेगमर्यादा आणि वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कंटेनर चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून संबंधित चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहाबाज बागवान यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पत्नी व लहान मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने पीडित कुटुंबाला तातडीची मदत व योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरात बेजबाबदार कंटेनरचालकाच्या भरधाव वेगाने एका तरुण दुचाकीस्वाराचा बळी गेला आहे. #ChhatrapatiSambhajinagar #Accident pic.twitter.com/NEkZvUPlvL
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) February 9, 2026