राज्यातील 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोलापूरमध्ये भाजपने जोरदार यश मिळवले होते. आतापर्यंत सोलापूरमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत भाजपने स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला होता. मात्र, या वेळी भाजप स्वबळावर लढत असून, अपवाद वगळता करमाळा आणि सांगोला या भागात 68 पैकी 59 जागांवर भाजप स्वतःचे उमेदवार उभे करत आहे. उरलेल्या 2 जागा युतीतून लढत आहेत. आजच्या मतमोजणीच्या निकालात सोलापूरमध्ये भाजप आपला गड राखणार का, याकडे लक्ष लागले आहे.