पुणे: पुण्यात महापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेसचे अश्विनी लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सावंत आपली यांनी अर्ज माघारी घेतला आहे. भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी (PMC Mayor) बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात आज महापौर (PMC Mayor) पदाची निवड होणार होती. महापालिकेतील सभागृहात सगळे १६५ नगरसेवक दाखल झाले. त्यानंतर अजित पवार, बाबा आढाव आणि सुरेश कलमाडी यांचं निधन झालं त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपच्या गटनेत्यानी विनंती केली, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीला अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी वर्णी लागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा दीपक नागपुरे या महापौरपदी बिनविरोध निवडून आल्याची जिल्हाधिकारी आणि पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घोषणा केली आहे.(PMC Mayor)
पुण्यात मंजुषा नागपुरे यांची महापौर पदासाठी वर्णी लागली आहे. त्यापूर्वी त्यांनी कसबा गणपतीच दर्शन घेतलं, महापालिकेत महापौर पदासाठी विराजमान होण्यासाठी जाण्याच्या आधी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला आहे. सत्ता नाही तर काम करण्याची संधी आहे. महिला पुरुष काही नसून महापौरला सगळी काम करावी लागतात. आश्वासन न देता काम करणार आहे. सासूबाई आणि आईची आज आठवण येत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.(PMC Mayor)
भाजपच्या मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून त्यांनी अर्ज भरला होता. त्या सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. अशातच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागातील तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे.
भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर झाले आहेत.
एकूण जागा १६५
भाजप- ११९
शिवसेना -०
उबाथा-१
राष्ट्रवादी शरद पवार-3
राष्ट्रवादी अजित पवार-२७
काँग्रेस -१५
एमआयएम-०
अपक्ष-०
इतर -०
आणखी वाचा