लिटिल आयडल किड्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : लिटिल आयडल किड्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
“सुहाने रिश्ते” या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व आकर्षक नृत्यप्रयोग सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. आमदार विक्रांत पाटील यांनी मुलांच्या कौशल्याचे कौतुक करताना, “ही मुले देशाचे भविष्य असून त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, उत्कर्ष समिती रायगडचे जिल्हाध्यक्ष विश्वास भगत, अतुल तांबे, संगीत शिक्षक दीपक कदम, आगरी अभिनेत्री रंजिता पाटील, हिरामण कोकणे, राहुल गुप्ता व जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते.
कार्यक्रमात शिक्षकांनीही नृत्य सादर करून रंगत वाढवली. स्कूलचे चेअरमन मनोज गुप्ता, प्राचार्य पुनम गुप्ता तसेच शिक्षक शीतल भामरा, सुजाता चोरगे, जयीता कर्माकर, मृणाल पवार, श्रद्धा नवघणे, विद्या महाले व धनश्री बोरगावकर यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले. सूत्रसंचलन शिवानी तिवारी यांनी केले.