सांगोल्यात गावगुंडांकडून तलवारीनं मारहाण, शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार देशमुखांनी सुरु केलं आंदोलन
सुनील दिवाण, एबीपी माझा February 09, 2026 11:13 PM

Sangola Zilla Parishad Election Result 2026 : आज राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निकालात सांगोला तालुक्यातील कोळा या जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रणित सांगोला तालुका विकास आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. यानंतर कोळा येथील गावगुंड आणि काही सांगलीच्या गुंडांनी गावात तलवारीच्या साह्याने दहशत माजवल्याची घटना घडली आहे. काही जणांवर तलवारीचे वार केल्याने गावात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यानंतर शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने कोळा इथं येऊन या गावगुंडांवर तातडीने पोलिसांनी खडक कारवाई करण्याची मागणी करत ठिया आंदोलन सुरु केले आहे. 

जोपर्यंत पोलीस या गावगुंडांवर कारवाई करत नाही तोपर्यंत शेकडो ग्रामस्थांसह आपण सुरु केलेले ठिय्या आंदोलन सोडणार नसल्याचा इशारा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे. दरम्यान कोळा येथील मुख्य चौकात शेकडोच्या साह्याने ग्रामस्थ एकत्रित येऊन आंदोलन सुरू केले आहे. दिवसांनी वेळीच कारवाई केली असती तर लोकांना असा मार खावा लागला नसता असा संताप ग्रामस्थात आहे. 

24 तासाच्या आत सांगली आणि कोळा येथील गावगुंडांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा...

यावेळी आमदार देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला 24 तासाच्या आत सांगली आणि कोळा येथील गावगुंडांवर तातडीने कारवाई न केल्यास सांगोला पोलीस स्टेशन समोर आमदार बाबासाहेब देशमुख आणि डीवायएसपी ऑफिस समोर त्यांच्या डॉक्टर पत्नी बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा पोलिसांना दिला आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते आणि महिला पुरुष ग्रामस्थांना गाव गुंडांकडून आणि सांगलीच्या गुंडांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू झाले होते. कोळा आणि सांगलीतील गावगुंडांनी तलवारीने गोरगरीब ग्रामस्थांना मारहाण केली आहे. पोलिसांनी कारवाई न केल्याने पोलीस या गुंडांना पाठीशी घालत असल्याचे ग्रामस्थ सांगत असून हा प्रकार गंभीर असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाला आमदार देशमुख यांनी दिला आहे. कोळा येथील चौकात आता चार ते पाच हजार ग्रामस्थांचा जमाव जमला असून कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन आमदार डॉक्टर देशमुख यांनी केले आहे. 

Dharashiv ZP Election Result 2026 : धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतील स्पष्ट बहुमत, खासदार ओमराजेंना मोठा धक्का 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.