दारुसोबत नेहमी चकणा म्हणून तिखट पदार्थच का खाल्ले जातात, गोड का नाही? कारण ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
Tv9 Marathi February 19, 2026 10:46 PM

दारूसोबत चकणा म्हणून नेहमी तिखट पदार्थच का खाल्ले जातात? गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर दारू पिताना गोड पदार्थ खाल्ले तर काय होऊ शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तुम्ही जेव्हा मद्यपान करण्यासाठी बारमध्ये जाता तेव्हा तिथे पार्टी टेबलवर चकणा म्हणून फक्त तिखट पदार्थच ठेवलेले असतात, ज्यामध्ये खारे शेंगदाणे, चिप्स, वेगवेगळे तळलेले तिखट पदार्थ अशा वस्तू ठेवलेल्या असतात प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते, कोणी दारूसोबत चकणा म्हणून शेंगदाणे खातं तर कोणी चिप्स काही जण इतर पदार्थ देखील खातात, पंरतु दारू पिताना कोणीही चकणा म्हणून आजपर्यंत गोडपदार्थ खाताना तुम्ही पाहिलं नसेल, त्या मागे नेमकं कारण काय आहे? हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर आपण आज याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दारू पिताना नेहमी तिखड पदार्थच खाल्ले जातात, कारण त्यामागे एक विज्ञान आहे,  जो व्यक्ती दारू पिते त्याला चवेशी काहीही देणं घेणं नसतं, कारण दारूची चव ही अतिशय विचित्र थोडीशी आंबट गोड अशी असते, अशा स्थितीमध्ये तो चकणा न खाता एकसारखी दारू पिला तर त्याला ओमेंटिंगचा त्रास होऊ शकतो. मात्र चकणा हा तिखट आणि मिठापासून बनवलेला असतो, तो अशा परिस्थितीमध्ये जीभेवर टेस्ट बड्स जागृत करण्याचं काम करतो, त्यामुळे तुम्ही आरामात दारू पिऊ शकता. आता पाहुयात दारू पिताना कधीही गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत.

दारु पिताना कधीही चकणा म्हणून गोड पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण त्या मागे एक मोठं कारण आहे, अनेक मिठाई या दुधापासून बनवलेल्या असतात, दुध आणि साखर हे दोन असे घटक आहेत, ज्यांचं अल्कोहोल सोबत रिअ‍ॅक्शन होताच ओमेंटिग होते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दारूचा ओव्हरडोस होतो आणि तो सर्व कंट्रोल गमावून बसतो तेव्हा अशा व्यक्तीची नशा कमी करण्यासाठी त्याला गोड पदार्थ खावू घातले जातात, ओमेंटिगनंतर नशा उतरले, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दारूची चवच अशी असते की तुम्ही दारू पिताना कधीही गोड पदार्थ खावू शकत नाहीत.

डिस्क्लेमर –  ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.