MGV26B15397
प्रभाकर चव्हाण
भाळवणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी चव्हाण
मंगळवेढा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी प्रभाकर दामाजी चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी भारती साखरे यांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी निवडी संदर्भातील पालकांची बैठक शाळेत पार पडली. या बैठकीमध्ये निवडी करण्यात आल्या. यावेळी या निवडीमध्ये दिगंबर कोळेकर, अमृता साखरे, तुकाराम रोंगे, प्राजक्ता गायकवाड, दीपाली साखरे, शिक्षण प्रेमीतज्ञ म्हणून प्रकाश वरकुटे, ग्रामपंचायत प्रतिनिधी लक्ष्मण गायकवाड, शिक्षक प्रतिनिधी दीपाली माळी, सचिव सुरेश इंगोले यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या. निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.