श्रीकृष्ण गुरुकुल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
esakal February 20, 2026 04:45 AM

श्रीकृष्ण गुरुकुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

कोरवली : वाघोलीवाडी (ता. मोहोळ) येथील श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रमोद अवताडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कामतीचे सहायक पोलिस निरीक्षक बसवराज जकीकोरे आणि फौजदार प्रमोद दीक्षित उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून देत, शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. प्रमोद अवताडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊन सर्व पेपर चांगले सोडवा आणि यश संपादन करा असा सल्ला दिला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी सरपंच रामचंद्र पतंगे, हिरजचे मुख्याध्यापक प्रा. अविनाश पाटील, श्रीकृष्ण संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंत निकम, एम.बी. चव्हाण गुरुकुलचे मुख्याध्यापक प्रा. अप्पासाहेब कोळी, श्री राधा गुरुकुलच्या मुख्याध्यापिका प्रा. कल्याणी कोळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक इयत्ता दहावीचा विद्यार्थी तेजस बावचे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक प्रा. किशोर शिंगरे यांनी मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.