Chanakya Niti : या तीन गोष्टींपासून दूर रहा, ठरू शकतात मृत्यूचं कारण, चाणक्य काय सांगतात?
Tv9 Marathi February 20, 2026 06:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे मानसानं पैशांचं नियोजन कसं करावं? यासंदर्भात त्यांनी अनेक बाबी या आपल्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. मात्र चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसानं कोणत्या परिस्थितीमध्ये कंस वागावं? धोका कसा ओळखवा? आणि शत्रूवर मात कशी करावी? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात समाजात अशा काही गोष्टी असतात, त्यांच्यासोबत तुम्ही जर जवळीक केली तर तुमचा मृत्यू निश्चित असतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, या गोष्टींच्या जवळ जाण्याची चूक करू नये, आणि जवळ गेलातच तर अखंड सावध असावं. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यानी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

साप – चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी सापापासून सावध असलं पाहिजे, तुम्ही सापाशी किती मैत्री करा, मात्र तो तुम्हाला धोका देणार म्हणजे देणारच. साप तुम्हाला दंश करणार, सर्पदंशामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे कधीही सापाच्या जवळ जाऊ नका, सापापासून योग्य अंतर राखण्यातच तुमचं भलं आहे, सापाजवळ गेल्यास तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

आग – चाणक्य म्हणतात जसा साप हा विषारी असतो, त्याच्या दंशामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो, तसंच आगीचं देखील आहे. आग क्षणात सर्व भस्मसात करू शकते. तुम्ही जर आगीमध्ये सापडलात तर तुमचा मृत्यू निश्चित असतो, त्यामुळे आगीपासून नेहमी सावध रहावं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पाणी – आर्य चाणक्य म्हणात पाणी हे जीवन आहे, मात्र ते जर अनियंत्रीत झालं तर पाण्या इतका विनाश इतर कोणतीही शक्ती करू शकत नाही. सर्व नष्ट करण्याची ताकद पाण्यामध्ये आहे. त्यामुळे माणसाने पाण्यापासून सावध असावं, विहिर, तलाव, समुद्र अशा ठिकाणी गेल्यास सावधानता बाळगावी, तुमच्या एका चुकीमुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.