कास - पेटेश्वरनगर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम....
esakal February 20, 2026 07:45 AM

पेटेश्वरनगर विद्यालयात रंगला निरोप समारंभ

कास, ता. १९ ः आदर्श माध्यमिक विद्यालय, पेटेश्वरनगर पेट्री बंगला येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी पंचायत समिती सदस्य वसंतराव भंडारे व शोभा लोटेकर उपस्थित होते, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश सावंत, बाजार समितीचे संचालक संजय पवार, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेडगे, उपाध्यक्ष पांडुरंग शेडगे, संस्थापक सचिव शंकरराव जांभळे, अंकुशराव मोरे, संचालक महादेव अहिरे, श्रीरंग अहिरे, सखाराम शिंदे, परशुराम वारागडे, दीपक देवरे, संदीप सपकाळ, मुख्याध्यापक चंद्रकांत साखरे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्री. भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा सल्ला दिला. परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर यश निश्चित मिळते. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभे राहणे हेच खरे यशाचे गमक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे आवाहन केले. यावेळी शोभा लोटेकर, सुरेश सावंत, अरुण शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. उल्का पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.

04591

पेटेश्वरनगर ः निरोप समारंभप्रसंगी विद्यार्थी व मान्यवर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.