हिंगोली : औंढा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अत्याचार केले. दरम्यान, या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली. या प्रकरणी संबंधित तरुणावर बुधवारी (ता. १८) गुन्हा नोंद झाला आहे. तरुणाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी औंढा नागनाथ तालुक्यातील एका शाळेत शिक्षणासाठी होती. संशयित अमोल माहोरे याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर पुणे येथे नेऊन अत्याचार केला.
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अत्याचार केल्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. ही बाब लक्षात आल्यानंतर अमोल याने त्या मुलीस गर्भपात कर; अन्यथा तुझ्यासोबत लग्न करणार नाही, अशी धमकी दिली.
Chhatrapati Sambhajinagar News : खाकीनं शोधली चिमणी पाखरं! घरच्यांवर रुसून, रागावून निघून गेली होती घर सोडूनपीडित मुलीने सर्व प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या आईने औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल माहोरेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक दत्ता कानगुले करीत आहेत.