Panhala Shiv Jayanti : शिवजयंती निमित्त पन्हाळगडावर मेगा पदयात्रा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, अवघा गड झाला शिवमय
esakal February 20, 2026 03:45 AM

पन्हाळा : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालया मार्फत १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मेगा पदयात्रा या युवा मोहिमेचे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पन्हाळगडावर मेगा पदयात्रा नेटक्या नियोजनात व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पारपडली . सकाळी साडेआठला आमदार डॉ. विनय कोरे, यांच्या हस्ते ध्वज फडकावून शिवमंदिरापासून मेगा पदयात्रेला सुरुवात झाली.

Shivjayanti:'शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणं मान्य नाही!' योगी आदित्यनाथ कडाडले; आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीचे आयोजन

या मेगा पदयात्रेत कुमार वि.मं. पन्हाळा या शाळेचे झांज पथक संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा घोडे पथक, संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा, नरके पब्लिक स्कूल पन्हाळा,वारणा कॉलेज वारणानगर,देवाळे हाय. देवाळे व गर्ल्स हाय.

नेबापूर या शाळांची एनसीसी पथके तर कुमार वि.मं. पन्हाळा व आर आर अकादमी बोरपडळे या शाळांची लेझिम पथके, तसेच विवेकानंद कॉलेज कोल्हापूर याची एनसीसी, एन एस एस पथके सामील झाली होती.शिव मंदिरापासून निघालेली ही मेगा पदयात्रा सज्जाकोठी,मुख्य रस्त्यावरून बाजीप्रभू देशपांडे पुतळा, बाजारपेठेतून मयूर उद्यान येथे आली.

Shivjayanti : शिवनेरीवर आज रंगणार शिवजन्मसोहळा; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

त्यावेळी कुमार वि.मं. पन्हाळा या शाळेच्या विध्यार्थ्यांनी झांज व लेझिम खेळाची तर आर आर अकादमी बोरपडळे या शाळेच्या लेझिम व मर्दानी खेळाची प्रत्यक्षिके सदर केली.यावेळी मान्यवरांचे स्वागता नंतर पन्हाळा नगरपरिषदेला माझी वसुंधरा अंतर्गत मिळालेल्या यशासाठी आम. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा तसेच माझी वसुंधरा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात दुसरा नंबर मिळवल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचाही सत्कार करण्यात आला.

'छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेल्या पन्हाळगडावर शिवरायांच्या ३९६ व्या जयंती निमित्य भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालया मार्फत आयोजित युवा मोहिमे अंतर्गत मेगा पदयात्रेत पन्हाळा वि.मं. पन्हाळा (हाय.),कुमार वि.मं. पन्हाळा,संजीवन पब्लीक स्कूल पन्हाळा,नरके पब्लीक स्कूल पन्हाळा,वारणा कॉलेज वारणानगर,देवाळे हायस्कूल देवाळे,गल्स हायस्कूल नेबापूर, आर आर अकॅडमी बोरपाडळे,

जोतिलिंग हाय.माले,तात्यासाहेब कोरे इंग्लिश अॅकॅडमी,अशोकराव माने पॉलिटेक्निक वाठार,डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, शासकीय तंत्रनिकेतन आयटीआय पन्हाळा व कोल्हापूर, न्यू कॉलेज फार्मसी कोल्हापूर असे १४ शाळांचे दोन हजार विद्यार्थी व पन्हाळगड तसेच परिसरातील शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

शिवजयंती निमित्त पन्हाळगडावरील शिवमंदिरात आम . डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता, उप वनसनरक्षक धैर्यशील पाटील,निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे,उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, नगराध्यक्षा जयश्री पोवार,,

सर्व नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाजन्मकाळावेळी पन्हाळ्यातील महिलांनी पाळणा गिता नंतर मेगा पदयात्रेची सांगता झाली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या रक्त दान शिबिरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रक्तदान केले. तर युवा प्रतिष्ठान पन्हाळा यांचे वतीने नगरपरिषद कार्यालयात आयोजित केलेल्या रक्त दान शिबिरास मान्यवरांनी भेट दिली.

चौकट...पदयात्रेचे आकर्षण

पदयात्रेच्या अर्गभागी असलेले कुमार वि.मं. पन्हाळा या शाळेच्या लहान मुला मुलींचे झांज पथक तसेच पदयात्रेत सहभागी झालेल्या ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल माले शाळेतील सातवीत शिकणारी विद्यार्थिनी बाबासो राजनंदिनी पाटील जिजाऊ मातेच्या रूपात, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात अखिलेश विनोद धुमाळ पदयात्रेचे आकर्षण ठरले.

पन्हाळा : पन्हाळगडावर शिवजयंतीनिमित्त निघालेली मेगा पदयात्रा. या पदयात्रेमध्ये आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव,उप विभागीय अधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, नगराध्यक्षा जयश्री पोवार सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्यासह नागरिक सहभागी झाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.