Shivneri fort news : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली असताना चेंगराचेंगरी झाल्याच्या चर्चांना पोलिसांनी फेटाळले आहे. पहाटेच्या सुमारास जिन्यावर पाय घसरून तिघेजण किरकोळ जखमी झाले असून कोणतीही गंभीर दुर्घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संदीप सिंग गिल्ल (पुणे ग्रामीण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१८ फेब्रुवारी) सकाळपासून शिवजन्मस्थानावर भाविकांची मोठी वर्दळ होती आणि रात्रभर दर्शन सुरू होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवभक्तांचा एक जथा शिवज्योत घेऊन गडावर दाखल झाला. काही युवक ज्योत घेऊन वेगाने पुढे सरकत असताना मीना दरवाजाजवळ तैनात पोलिसांनी त्यांना सावकाश जाण्याचे आवाहन केले.
View this post on InstagramA post shared by SaamTvNews (@saamtvnews)
याच वेळी गर्दीमुळे एका भाविकाचा पाय घसरला आणि त्याच्यासह आणखी काही जण खाली पडले. या घटनेत तिघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, गडावर कोणतीही चेंगराचेंगरी झाली नसल्याचे एसपी गिल्ल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अंबरखान्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी उसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेशद्वाराजवळ ढकलाढकली झाल्याने काही महिला व लहान मुलांसह काही जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Shivaji Maharaj Jayanti 2026: ‘या’ किल्ल्यावर आजही दिसतात शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे; वाचा संपूर्ण इतिहासशिवजयंतीच्यापार्श्वभूमीवर आधीपासूनच पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेनंतर अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली असून शिवभक्तांना टप्प्याटप्प्याने गडावर प्रवेश दिला जात आहे. तसेच गडावरून खाली उतरताना धावाधाव करू नये, शिस्त पाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.