जिल्ह्यातील डोंगरगण परिसरातील वांबोरी घाटात दोन दिवसांपूर्वी एका गोणीत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृतदेहाची ओळख पटवलीच, शिवाय हत्येचा थरारक उलगडा करत दोघा आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव किरण शिवाजी कवाने असे असून, त्याची हत्या त्याचाच सख्खा भाऊ योगेश शिवाजी कवाने याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वडील शिवाजी शंकर कवाने यांनी देखील मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बाप-लेक दोघांनाही अटक केली आहे
भिवंडीत भाजपाला धक्का, बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला, सीसीटीव्हीमध्ये घटना कैदपुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला
पुण्यातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात चिमुरडा थोडक्यात बचावला
भटक्या कुत्र्यांवर महापालिका प्रशासन काय उपाययोजना राबवणार?
पुणेकर महापालिका प्रशासनावर नागरिकांचा संताप
पुण्यातील किरकटवाडी येथील चैत्रांगण सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला
मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने चिमुरडा थोडक्यात बचावला
शासनाच्या धोरणा विरोधात धुळ्यात मक्का उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब परिसरात मक्याचे भरलेला ट्रॅक्टर आणून मक्का उत्पादक शेतकऱ्याने शासनाचा निषेध केला आहे, जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मक्का फेकून शासनाचा करण्यात येणार होता निषेध परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला रोखले, संबंधित शेतकऱ्याने प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, दहा दिवसात पुन्हा मक्का नोंदणी सुरू करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा संबंधित शेतकऱ्याने प्रशासनाला इशारा दिला आहे
राज्यातील वाहतूकदार करणार चक्काजाम, पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलनराज्यात 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या वाहतूकदार चक्काजाम आंदोलन करणार आहेत.पुणे शहरातील एटीएस अभावी पासिंगचे काम बंद असून त्याचबरोबर राज्यातील सर्व संघटना एकत्रित येऊन ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीद्वारे इ चलन प्रणाली द्वारे वाहन चालकांची होत. असलेली लूट येत्या आठ दिवसात राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास चक्काजाम आंदोलन जाहीर केलेले आहे. पोलीस प्रशासनाकडून ही चलनाद्वारे वाहन चालकांकडून दंड वसुली केली जाते. परंतु या प्रणालीमध्ये आज अनेक इचलन नियमबाह्य पद्धतीने आकारलेले आहे. एक वर्षांपूर्वी सरकारने दिलेला शब्द पाळलेला नसल्यामुळे राज्यस्तरीय सर्व वाहतूक संघटना यांनी हा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने नुकतेच नवीन नियमावली मध्ये बदल करून ही चलनाचा दंड न भरल्यास वाहन जप्त करण्याचे निर्णय घेतलेला आहे. या सर्वाला विरोध म्हणून आज पुणे शहरातील सर्व संघटना कृती समिती बॅनरच्या खाली एकत्र येऊन आंदोलन करण्यात आलं
भिवंडीत महापौर पदासाठी ३ जणांमध्ये लढतभिवंडीत 9 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. महापौर पदासाठी आता नारायण चौधरी, आणि विलास पाटील आणि स्नेहा पाटील तिघांमध्ये लढत होणार आहे
सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळसोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ
भाजपकडून 9 सदस्यांची निवड आज होणार होती मात्र 8 सदस्यांची नावे जाहीर केल्याने विरोधी पक्ष नगरसेवकांनी घातला गोंधळ
शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांनी घेतला आक्षेप
महापौर विनायक कोंड्याल यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी घेतली धाव
महापौर विनायक कोंड्याल यांनी वाढता तणाव लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज थांबवले
नांदेडमध्ये शिवजयंती मिरवणुकीत पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीमार केलाय, या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विना परवाना लावलेला डीजे काढण्यास पोलीस गेले होते, त्यावेळी तरुणांनी त्याला विरोध केला. यावेळी पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज केला. मात्र या घटनेनंतर युवकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पोलीस जाणीवपूर्वक आम्हाला टारगेट करत आहेत असा आरोप युवकांनी केला. तर विनापरवाना लावलेला डीजे ताब्यात घेत असताना डीजेचे सामान पळून नेत असल्याने आम्ही रोखण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरवातपहिल्याच सर्वसाधारण सभेला 15 पेक्षा अधिक नगरसेवकांची दांडी..
सातव्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर विलास इंगोले यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड
विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झालेले विलास इंगोले हे अमरावती महानगरपालिकेतील सर्वात जेष्ठ नेते
सत्ता पक्षांचा सभागृह नेता म्हणून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड.
परभणीत आज सहजपूर जवळा,आमडापूर आणि कोठाळा या ३ गावाच्या शिवारात शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया पार पडत आहे या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे.मात्र पोलिसानी दंडेलशाही करत अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे यावेळी विरोध करणाऱ्या महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ही ओतून घेतले मात्र शेतकऱ्यांचा हा विरोध पोलिसांनी मोडीत काढला आणि महसूल,भूमी अभिलेख आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजणीला सुरुवात केली आहे
बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळबीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. बीड तालुक्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी चक्क मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या वाढल्याचे कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून येथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शिवाय तापमान वाढत असल्याने उकाड्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. बारावी नंतर दहावीची परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सावळा गोंधळ समोर आलाय.
जळगावमध्ये प्रशासक नियुक्तीला सरपंचांचा विरोध आज ग्रामपंचायत बंदजळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र निवडणुका तातडीने घेण्याऐवजी प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला सरपंच व पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच व उपसरपंचांकडेच जबाबदारी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीसाठी आज 'ग्रामपंचायत बंद'चा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत टप्याटप्याने संपला.
पहिल्या टप्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महापालिका निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित राहिल्या. सध्या राज्यभर ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी नियमित निवडणुकांबाबत हालचाल नसल्याने प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
टीडब्ल्यूजे कंपनीचा संभाजीनगरमध्येही १० कोटींचा गंडागुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील मोठ्या शहरातल्या ११ हजार गुंतवणूकदारांना १२०० कोटींचा गंडा घालणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीने आता छत्रपती संभाजीनगरमध्येही १० कोटींचा गंडा घातल्याचे समोर
परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायमपरभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा,आमडापूर आणि कोठाळा या ३ गावच्या परिसरात आज शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी केली जाणार आहे मात्र या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.पोलिसानी आज पहाटेच या महामार्गाला विरोध करणाऱ्या विविध पक्ष,संघटना आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.ज्या ३ गावात जमीन मोजण्यासाठी अधिकारी येणार आहेत या अधिकाऱ्यांना आमचा जीव गेला तरी आम्ही आमची जमीन आम्ही मोजू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे यामुळे शेतकरी आज मोठ्या संख्येने एकवटले आहेत शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैलगाड्या उभा करून आम्ही आमच्या शेताकडे अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही असे म्हणत रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे.कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला मोजणी करायची असल्याने ३ ही ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ज्यामुळे छावणीचे स्वरूप या परिसराला आले आहे.
पस्तीस हजार मीटर दोऱ्यातून साकारली शिवरायांची प्रतिमाजयंतीनिमित्त सोलापूर शहरात उत्साहाचे वातावरण असताना एका आगळ्या वेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिमेने सोलापूरकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.सोलापूर मधील प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर याने तब्बल २२ बाय २२ फुटांची (सुमारे ४५० चौरस फूट) शिवरायांची प्रतिमा दोरा अन् स्टीलच्या साहाय्याने साकारली आहे.
आजपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षाराज्यात १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाला मध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण
हॉल तिकीट चेक करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात येत आहे
शाळेच्या परिसरातील सर्व झेरॉक्स चे दुकानं बंद
कॉपीमुक्त परीक्षांचे बोर्डाकडून अभियान
माझी वसुंधरा अभियानात कुडाळ नगरपंचायत विभागस्तरावर प्रथममहाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.
याबाबतचा अधिकृत शासन निर्णय १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.
आगामी काळात कुडाळ नगरपंचायत पूर्ण ताकदीनिशी या अभियानात सहभागी होणार असून, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून, हि नगरपंचायत राज्यस्तरावर अव्वल येण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत असेही बांदेकर यांनी सांगितले.
अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून सुरू होणार.अमरावती विमानतळावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आवश्यक यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
डीजीसीएची (DGCA) टीम पाहणीसाठी अमरावतीत येणार आहे.पाहणीनंतर रात्री विमानांची ये-जा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येनार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (MADC) कामांना गती देण्यात येत आहे.
धावपट्टी वाढ व इतर पायाभूत सुविधांमुळे विमानतळ अधिक सक्षम होणार
ह्या नाईट लँडिंग मुळे अमरावती जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन व उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार.
पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलावाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांचे हाल होऊ नये म्हणून विशेष सोय
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची विशेष सोय
जंगलातील नैसर्गिक झरे व पाणवठे कोरडे पडल्याने मोर, ससे, हरीण, काळवीट, रानडुक्कर यांसारखे वन्यजीव पाण्यासाठी नागरी वस्त्यांकडे वळत आहेत
या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे
वन्यप्राणी व पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे
रानडुकरांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटकजंगली रांडुकरांना पकडून त्यांची तस्करी करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकानं अटक केली. वनपरिक्षेत्राधिकारी यांचं पथक पहाटेच्या सुमारास तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या झंझेरिया बीटाच्या वाघसांध्या तलाव परिसरात गस्तीवर असताना, काही तरुण या भागात संशयास्पद आढळून आले. त्यांची चौकशी केली असता बोलोरो वाहनामध्ये रानडुक्कर, काही धारदार हत्यार आणि डुक्कर पकडण्याचे साहित्य आढळून आले. हे सर्व रानडुक्कर तस्कर असून त्यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेशसह नागपुरमध्ये रानडुक्कर विक्री केल्याची त्यांनी कबुली दिली. सर्वांवर वन गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून एक बोलेरो वाहन, धारदार शस्त्र, लाठ्याकाठ्या, रानडुक्कर पकडण्याचे साहित्य आणि १२ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादरसिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आज पुन्हा दाट धुके पाहायला मिळाले. ग्रामीण भागासह शहरीभागात पहाटे पासून दाट धुके पडल्याने रस्ते धुक्यात हरवले होते. ऐन आंबा, काजूच्या हंगामात धुके पडत असल्यामुळे याचा थेट परीणाम मोहरावर होणार आहे. आधीच हापूस आंबा मोहरावर खार पडल्यामुळे जळून गेला आहे त्यातच पुन्हा धुके पडत असल्यामुळे याचा मोठा परीणाम आंबा काजू पिकावर होणार आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
गंगापूर रोडवरील पिटीसीसमोरील ६२ एकर जमिनीची मूळ कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून गायबजमीन व्यवहारातील गंभीर प्रकार उघड, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
संबंधित जमीन सन १९९६ मध्ये शासनजमा, मात्र २००३ पासून महत्त्वाची फाईल बेपत्ता
माहिती आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अवमान याचिका दाखल
न्यायालयाच्या फटकारणीनंतर अखेर नाशिक पोलिस आयुक्तालयात गुन्हा नोंद
दहावीची आजपासून परीक्षा; जळगाव शहरातील १५ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरदहावी बोर्ड परीक्षेला आज पासून सुरुवात होत असून सकाळी ११ ते २ या वेळेत मराठीचा पहिला पेपर आहे. शहरातील १५ केंद्रावर परीक्षा होणार सर्व ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाही तेथे मोबाइलवरून झूम अॅपच्या - साहाय्याने थेट लक्ष ठेवण्यात येणार आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातून ५९,४७८ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. प्रशासनाने कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी कंबर कसली असून नियम मोडणाऱ्यांवर भेंट फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे परीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर परीक्षा केंद्रांसाठीही कसोटी ठरणार आहे.
सामूहिक कॉपी प्रकरण उघड करणाऱ्या भरारी पथकाच्या सन्मानाची मागणीवाशिम जिल्ह्यात उघडकीस आलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अचानक छापा टाकून गैरप्रकार उघड करणाऱ्या भरारी पथकाच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या शासकीय सन्मानाचीही मागणी करण्यात आली आहे....
पुण्यातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होणारपरिवहन विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने पुणे शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओ कठोर कारवाईचा बडगा उगारणार
गेल्या १० महिन्यात ५१७ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
सुमारे ३.५ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे
बेशिस्त रिक्षा चालकांवर वारंवार कारवाई करूनही नियम पाळले जात नसल्याने आता आरटीओने रिक्षा चालकाचा वाहन परवाना (लायसन्स) तात्पुरता निलंबित किंवा थेट रद्द करण्याचा निर्णय
आरटीओ कार्यालयाती नोंदीनुसार, पुणे शहरात २०२५ अखेरपर्यंत सुमारे एक लाख २९ हजार रिक्षाचालक आहेत
शिवीगाळ करणे म्हणजे अश्लीलता ठरत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय- केवळ शिवीगाळ करणे म्हणजे अश्लीलता ठरत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
- भादंवि कलम २९४ लागू होण्यासाठी ‘अश्लीलतेची कसोटी’ आवश्यक, मात्र तक्रारी शिव्यांचा उल्लेख नसल्याने २०१९ मधील प्रकरणात गुन्हे रद्द
- कलम ३८४, ३८५ अंतर्गत खंडणीची अपुरे ठरले, ठोस वैद्यकीय पुरावे नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण.
- राजकीय वैमनस्यातून तक्रार दाखल झाल्याचा आरोपीचा दावा ग्राह्य धरत दाखल गुन्हे रद्द
- अकोला येथील महानगर नगरसेवकावर आरोप करत 2019 मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद.बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले होते. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पिंपळगाव काळे गावात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात- राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात..
- नागपूर जिल्ह्यात 58 हजार 458 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा.. पहिला पेपर मराठीचा असणार..
- मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 368 विद्यार्थी संख्येत वाढ.. परिक्षेकरीता 222 केंद्रे निश्चित..
- नागपूर जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील घोषित..
- परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रश्न पत्रिकांची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी 84 गोपनीय केंद्राची स्थापना..
- कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथक तैनात..
चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग- दक्षिण सोलापूर तालुक्यातील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज- तिलाटी गेट परिसरात चेट्टीनाड सिमेंट कंपनी आहे
- कंपनीत असलेल्या ट्रान्सफार्मरला आग लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात
- दरम्यान या घटनेत कोणीही जखमी नसून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरूय