आचार्य जांभेकर यांना अभिवादन
esakal February 21, 2026 07:46 PM

तळेगाव दाभाडे, ता.२१ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मराठी पत्रकारितेचे जनक यांच्या २१४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष दाभाडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवार, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, गटनेते इंदरकुमार ओसवाल यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते. उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी आभार मानले. भास्कर वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.